तूर घोटाळा प्रकरण; आरोपींना कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:34 AM2017-09-26T00:34:21+5:302017-09-26T00:34:21+5:30
थील नाफेड केंद्रावरील तूर खरेदी घोटाळ्यात अटक केलेल्या १३ संशयित आरोपींना पोलिसांनी मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील नाफेड केंद्रावरील तूर खरेदी घोटाळ्यात अटक केलेल्या १३ संशयित आरोपींना पोलिसांनी मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश अनघा रोटे यांच्यासमोर हजर केले. न्यायालयाने संशयितांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस कोठडी सुनावलेल्या शरद किसन भुंबर, ज्ञानेश्वर विठ्ठल शिंदे, सतीश चंद्रकांत औशीकर, राजकमल श्रीराम तापडिया, सतीश हिरालाल बाहेती, भगवान नानासाहेब आनंदे, कैलास गणेशराव सहाणे, संजय देविदास मिसाळ, सुदर्शन पाटीलबा भुंबर, विशाल नकुलराव भिसे, कृष्णा मुरलीधर पवार, शिवकुमार बिसनलाल कामड, विरेंद, घेवरचंद रुणवाल यांचा समावेश आहे.