तीर्थपुरीत वीज उपकेंद्र

By Admin | Published: September 13, 2014 11:18 PM2014-09-13T23:18:28+5:302014-09-13T23:28:11+5:30

तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील भविष्यातील विजेची मागणी ओळखून नवीन १३२ केव्ही वीज उपकेंद्राची उभारणी केली जाईल, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Pilgrimage power sub-center | तीर्थपुरीत वीज उपकेंद्र

तीर्थपुरीत वीज उपकेंद्र

googlenewsNext


तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील भविष्यातील विजेची मागणी ओळखून नवीन १३२ केव्ही वीज उपकेंद्राची उभारणी केली जाईल, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
गुरूवारी १३२ केव्हीचे भूमिपूजन टोपे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वीज वितरणचे मुख्य अभियंता आर.एल. मस्के, अधीक्षक अभियंता कादरी, शशांक जेवळीकर, भूषण बल्लाळ, संजय वाघ, उत्तमराव पवार, तात्यासाहेब चिमणे, राजेश मानकरे, सुदाम मापारे, शामराव मुकणे, मधुकर देशमुख, राजेंद्र कोल्हे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रास्तावित तीर्थपुरी १३२ चा लोड सध्या अंबड व घनसावंगी १३२ केव्ही वरून चालत असून, पूर्वतयारी दूरदृष्टी लक्षात घेता तीर्थपुरी १३२ केव्हीला मंजुरी घेतली असून, या १३२ मुळे २०१७ मध्ये जे प्रस्तावित ३३ केव्ही उपकेंद्र कार्यान्वित होताच त्यांना यातून वीजपुरवठा मिळेल. या १३२ केव्हीसाठी २२ कोटी ७७ लाख रुपये खर्च येणार असून, या उपकेंद्रासाठी सागर स.सा.कारखान्याने १० एकर जमीन मोफत दिल्याने वीज वितरण कंपनीला १ कोटी १३ लाख रुपये खर्चाचा फायदा झाला आहे.
तीर्थपुरी, अंतरवाली टेंभी, सुखापुरी, साडेगाव, एकलहेरा, शिवनगाव, बानेगाव येथील ३३ केव्हीला वीजपुरवठा होणार आहे. या केंद्रातून ३३ केव्हीचे चार फिडर्स निघतील तसेच २५ एमएचे पॉवर रोहित्र २ असतील.
या उपकेंद्रामुळे तीर्थपुरीसह घनसावंगी तालुक्यात मोठ्या प्रमाणात सिंचनाची कामे झालेली असल्याने आणि बॅरेजेसमधील शेतीसाठी पाण्याचा उपसा करताना वीज कमी पडणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची उन्नती होईल, असे टोपे यांनी सांगितले. यावेळी दिलीपराव पवार, तुषार पवार, राजेंद्र परदेशी, कैलास जारे, अनिल भालेकर, शंकर मिंधर, विविध सहकारी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Pilgrimage power sub-center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.