पिंपळवाडी पिराची गावातील सांडपाण्याचे पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:05 AM2021-06-26T04:05:57+5:302021-06-26T04:05:57+5:30

याप्रसंगी दत्तात्रय गोर्डे म्हणाले की, गेल्या चार महिन्यांपासून पिंपळवाडी पिराची गावातील नागरिकांच्या घरांच्या सांडपाण्याचे नियोजन नसल्याने ते पाणी रस्त्यावरून ...

Pimpalwadi Pirachi village sewage worship | पिंपळवाडी पिराची गावातील सांडपाण्याचे पूजन

पिंपळवाडी पिराची गावातील सांडपाण्याचे पूजन

googlenewsNext

याप्रसंगी दत्तात्रय गोर्डे म्हणाले की, गेल्या चार महिन्यांपासून पिंपळवाडी पिराची गावातील नागरिकांच्या घरांच्या सांडपाण्याचे नियोजन नसल्याने ते पाणी रस्त्यावरून वाहात असून, दुर्गंधी पसरली आहे. या पाण्यामुळे मोठे तळे निर्माण झाले असून, वाहनधारकांना पावसाळ्यात याचा त्रास सहन करवा लागत आहे. तसेच यामुळे खड्डेच दिसत नसल्याने त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत असून, पाणी भरलेले खड्डे दिसत नसल्याने अपघात होत आहेत. या सांडपाण्याची संबंधित पिंपळवाडी पिराची व मुधलवाडी ग्रामपंचायतीने विल्हेवाट लावावी, नसता नाहरकत प्रमाणपत्र द्यावे, आम्ही ड्रेनेज पाईपलाईन करून दाखवू, असे त्यांनी सांगितले. यावेळी पंचायत समिती सदस्य विशाल थोटे, माजी उपनगराध्यक्ष अप्पासाहेब गायकवाड, संजीव कोरडे, सचिन ज्योतिक, समीर पटेल, साहिल पटेल, अन्सार शेख, सोहेल शेख, जावेद पठाण, इरफान शेख, मुजफ्फर शेख, परवेज शेख, अकील शेख, राम गलांडे आदींची उपस्थिती होती.

फोटो कॅप्शन : पिंपळवाडी पिराची येथील सांडपाण्याची विल्हेवाट न लावल्यामुळे ग्रामस्थांनी सांडपाण्याचे पूजन करीत निषेध केला.

250621\img_20210625_111055.jpg

पिंपळवाडी पिराची येथील सांडपाण्याची विल्हेवाट न लावल्यामुळे ग्रामस्थांनी सांडपाण्याचे पूजन करीत निषेध केला.

Web Title: Pimpalwadi Pirachi village sewage worship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.