पिंगळगड प्रकल्पामुळे सिंचनाचा प्रश्न सुटणार

By Admin | Published: May 3, 2016 01:03 AM2016-05-03T01:03:15+5:302016-05-03T01:07:51+5:30

परभणी : पिंगळगड नाला नदी पुनरुज्जीवन प्रकल्पामुळे या भागातील ३८ कि. मी. परिसरातील गावांच्या सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे.

Pingalgad project will solve irrigation issue | पिंगळगड प्रकल्पामुळे सिंचनाचा प्रश्न सुटणार

पिंगळगड प्रकल्पामुळे सिंचनाचा प्रश्न सुटणार

googlenewsNext


परभणी : पिंगळगड नाला नदी पुनरुज्जीवन प्रकल्पामुळे या भागातील ३८ कि. मी. परिसरातील गावांच्या सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन होत असून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून धन्यता वाटत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री दिवाकर रावते यांनी केले.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे रोजी पिंगळी येथे पिंगळगड नाला नदी पुनरुज्जीवन भूमिपूजन सोहळा पार पडला. उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री रावते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राजेश विटेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून आ. डॉ. राहुल पाटील, आ. मोहन फड, जिल्हाधिकारी राहुल महिवाल, जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, तालुकाप्रमुख नंदकुमार आवचार, जालना येथील लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता टी. एस. कोंडेकर, जि. प. सदस्य संताबाई लोखंडे, सरपंच उज्ज्वला खाकरे, युवा सेनेचे तालुकाप्रमुख संदीप झाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कपाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात प्रकल्पाच्या मान्यतेसाठी परिश्रम घेतल्याबद्दल आ. डॉ. राहुल पाटील यांचा पिंगळी व रायपूर ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
आ. डॉ. राहुल पाटील म्हणाले, पावसाचा प्रत्येक थेंब आडवून जमिनीत जिरविण्यासाठी बंधाऱ्यांची दुरुस्ती, नाला खोलीकरण, रुंदीकरणाची कामे झपाट्याने सुरु आहेत. पिंगळगड नाल्याचे नदी सारख्या विस्तृत पात्रात रुपांतर करण्यासाठी लघु पाटबंधारे विभागाचे अभियंता शिंदे, फरदील खान , विनय सुदेवाड, कोंडेकर यांची वेळोवेळी मदत झाली. या प्रकल्पांतर्गत येणाऱ्या १६ गावांमधील ग्रामस्थांनी मला प्रेरित केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या संकल्पनेनुसार या प्रकल्पाच्या दुतर्फा १० हजार झाडे लावून हा परिसर ग्रीन हब म्हणून विकसित केला जाणार आहे. पुढील वर्षी अशाच प्रकारे धामोडी नाला नदी पुनरुज्जीवन प्रकल्प पूर्णत्वास नेणार असल्याचे आ.पाटील यांनी सांगितले. प्रारंभी कनिष्ठ अभियंता शिवाजी शिंदे यांनी प्रकल्पाची तांत्रिक माहिती विषद केली. सूत्रसंचालन अभय कुलकर्णी यांनी केले. यशस्वीतेसाठी भाऊसाहेब गरुड, उमेश खाकरे, संजय गरुड, विजयराव गरुड, लखन गरुड, धोंडी खाकरे, रावसाहेब गरुड, संभाजी गरुड, डिगंबर गरुड, रामकिशन गरुड, संभाजी लोखंडे, राहुल लोखंडे, प्रकाश लोखंडे, मधुकर दामोधर, किशन दामोधर, भानुदास डुब्बे, नितीन गरुड, सिद्धांत वसमतकर, रणजीत मकरंद, अच्युत चापके, अंकुश मस्के आदींनी प्रयत्न केले. (प्रतिनिधी)
पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते जिल्हा ग्रंथालयाच्या नूतन इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण व तारांगण इमारत बांधकामाचे भूमिपूजन १ मे रोजी वसमत रोडवरील नियोजित जागा परिसरात करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल महिवाल, आ.डॉ.राहुल पाटील, आ.मोहन फड, जि.प.अध्यक्ष राजेश विटेकर, महापौर संगीता वडकर, उपमहापौर भगवान वाघमारे, सभापती गणेश देशमुख, मनपा विरोधीपक्ष नेत्या अंबिका डहाळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते तारांगण इमारत बांधकामाचे भूमिपूजन, जिल्हा ग्रंथालयाच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी आ.डॉ.पाटील, जिल्हाधिकारी महिवाल, महापौर वडकर यांनी मनोगत व्यक्त केले. रावते म्हणाले, शहराच्या विकासासाठी सदैव तत्पर असून विकासासाठी कधीही निधी कमी पडू दिला जाणार नाही. शहरातील सर्व रस्त्यांवरील अतिक्रमणे काढून होर्डिग्ज काढून टाकावीत. शहराचा श्वास मोकळा झाला पाहिजे, असे पालकमंत्री रावते म्हणाले. अभय कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी नवनीत पाचपोर, गोविंद पारडकर, राजेंद्र वडकर, अनिल डहाळे, राजू कापसे, संजय गाडगे, दीपक देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, जिल्हा ग्रंथालय अधिकारी रिद्दीवाडे, उपअभियंता ढोबळे यांची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी मनपाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Pingalgad project will solve irrigation issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.