पाईप ड्रील मशीन झुकली एका बाजूला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 12:39 AM2017-09-27T00:39:42+5:302017-09-27T00:39:42+5:30

येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम करताना जमिनीत खोलवर खड्डे खोदणारी पाईप ड्रील मशीन (क्रेन) काम सुरु असताना २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास एका बाजूने झुकली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.

Pipe drill machine tilt one side | पाईप ड्रील मशीन झुकली एका बाजूला

पाईप ड्रील मशीन झुकली एका बाजूला

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड: येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम करताना जमिनीत खोलवर खड्डे खोदणारी पाईप ड्रील मशीन (क्रेन) काम सुरु असताना २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास एका बाजूने झुकली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.
गंगाखेड शहरातील पालम रेल्वे फाटक परिसरात रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. मंगळवारी जमिनीत खोलवर पाईप ड्रील मशीनच्या सहाय्याने खोदले जात होते. काम सुरु असताना अचानक रस्ता खचल्याने ड्रील मशीन एका बाजुला झुकत असल्याचा प्रकार चालक मुकीतूल शेख यांच्या लक्षात आला. त्यांनी तत्काळ मशीनवरील सायरन वाजविल्याने मशीनजवळ काम करणारे मजूर व बाजूचे दुकानदार मशीनपासून दूर पळाले. कामावरील व्यवस्थापक किशोर गायकवाड, साबां विभागाचे परमेश्वर जवादे यांनी जेसीबी मशीन बोलावून चालक जहीर शेख, हैदर पठाण, शादूल शेख, वजाहद खान, मन्सूर शेख यांच्या मदतीने ड्रील मशीन एका बाजूने दाबून ठेवत दुसºया बाजूचे ड्रील मशीन काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ड्रील मशीन जास्त झुकल्याने जेसीबीचा दाब ठेवून मशीन त्याच ठिकाणी ठेवली. त्यामुळे मशीन कोसळताना वाचली व अपघात टळला.

Web Title: Pipe drill machine tilt one side

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.