जीटीएलच्या कर्मचाऱ्यांची दयनीय अवस्था
By Admin | Published: August 11, 2015 12:38 AM2015-08-11T00:38:07+5:302015-08-11T00:53:27+5:30
औरंगाबाद : जीटीएल कंपनीने गाशा गुंडाळून आठ महिने झाले असले तरी कंपनीत काम करणाऱ्या १ हजार ३४ कर्मचाऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे.
औरंगाबाद : जीटीएल कंपनीने गाशा गुंडाळून आठ महिने झाले असले तरी कंपनीत काम करणाऱ्या १ हजार ३४ कर्मचाऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. जीटीएल आणि कर्मचाऱ्यांचे एक प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट कायम असून, त्यांना बाहेरील संस्थेमध्येदेखील काम मिळत नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कर्मचारी संघर्ष कृती समितीने सोमवारी विभागीय आयुक्तांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
१०३४ कर्मचाऱ्यांना महावितरण कंपनीत सामावून घ्यावे. जीटीएल शहर-१ व २ मध्ये वीज वितरक म्हणून काम करीत होती. कंपनीवर महावितरणचे नियंत्रण होते. जीटीएलच्या अनेक कर्मचाऱ्यांना महावितरण कंपनीने प्रशस्तीपत्र दिलेले असताना ते देखील या कर्मचाऱ्यांना कामावर घेत नाहीत. जीटीएलच्या कर्मचाऱ्यांमुळे वीज गळतीचे प्रमाण कमी झाले होते. वीज बिल वेळेत वाटप होत असे. मराठवाड्यात सध्या दुष्काळसदृश परिस्थिती आहे. १ हजार ३४ कर्मचाऱ्यांमधील अनेक जण ग्रामीण भागातील आहेत. राज्य शासन, महावितरण आणि जीटीएल कंपनीतील अंतर्गत निर्णयामुळे या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट ओढवले आहे. या कर्मचाऱ्यांना महावितरणमध्ये कायम करण्याची मागणी समितीने केली आहे.