जागा दिली औरंगाबादला आणि विद्यापीठ नेले पुण्याला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:02 AM2021-07-29T04:02:01+5:302021-07-29T04:02:01+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यात करोडी येथे मंजूर केलेले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुण्याला निर्माण केले जात असल्याने एमआयएमने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ...
औरंगाबाद : जिल्ह्यात करोडी येथे मंजूर केलेले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुण्याला निर्माण केले जात असल्याने एमआयएमने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करीत आंदोलन केले. सरकारविरोधी घोषणाबाजीने जिल्हाधिकारी परिसर दणाणून गेला.
स्थानिक पातळीवरील आणि मराठवाड्यातील खेळाडूवर अन्याय करणारी ही बाब असून राज्य सरकार भेदभाव करीत आहे. असा आरोप एमआयएमचे शहराध्यक्ष शारेक नक्षबंदी, समीर साजीद आदींनी केला. विद्यापीठ येथे निर्माण करण्याचा निर्णय लवकर झाला नाहीतर न्यायालयात जाण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. एमआयएमचे पदाधिकारी आणि कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते.
यावेळी सिटी चौक पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त लावला होता.
दरम्यान सिटी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितले, हे आंदोलन विनापरवाना करण्यात आल्याने गुन्हा दाखल करण्यात येईल.
कॅप्शन.. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करताना एमआयएमचे कार्यकर्ते.