हातकडीवर रुमाल ठेवला, रात्री उसात झोपला; बलात्काराच्या गुन्ह्यातील पळालेला आरोपी सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 18:37 IST2025-02-28T18:34:43+5:302025-02-28T18:37:53+5:30

बलात्काराच्या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर आरोपी हातकडीसह पोलिसांच्या तावडीतून पळून गेला होता

Placed a handkerchief on the handcuffs, slept in a sugarcane farm at night; The absconding accused of rape was found in Chhatrapati Sambhajinagar | हातकडीवर रुमाल ठेवला, रात्री उसात झोपला; बलात्काराच्या गुन्ह्यातील पळालेला आरोपी सापडला

हातकडीवर रुमाल ठेवला, रात्री उसात झोपला; बलात्काराच्या गुन्ह्यातील पळालेला आरोपी सापडला

छत्रपती संभाजीनगर : बलात्काराच्या गुन्ह्यात अटक झालेल्या तुषार किसन करपे (२३, रा. विरमगाव, फुलंब्री) हा मंगळवारी हातकडीसह पोलिसांच्या तावडीतून पळून गेला होता. बुधवारी रात्री गुन्हे शाखेने त्याचा शोध घेत त्याला फुलंब्री तालुक्यातून पुन्हा ताब्यात घेतले.

२२ वर्षीय तरुणीने तुषार विरोधात बलात्कार, ॲट्रॉसिटीची तक्रार केली होती. सोमवारी वेदांतनगर पोलिसांनी त्याला गावातून अटक केली. मंगळवारी न्यायालयाने त्याला २८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सायंकाळी ५:३० वाजता अंमलदार प्रकाश नागरे, चालक अर्जुनसिंग जारवाल हे त्याला मेडिकल तपासणीसाठी घाटी रुग्णालयात घेऊन जात होते. तेव्हा लघुशंकेचे नाटक केलेल्या तुषारने अयोध्या मैदानाजवळून हातकडीसह पोबारा केला.

रात्रभर शेतात झोपला
पोलिसांच्या तावडीतून पळाल्याने तुषार घाबरला होता. कर्णपुरा परिसरातील शेतातून पळत राहिला. रस्त्यावर गेल्यास पोलिस पकडतील या भीतीने तेथेच झोपला. त्यामुळे त्याला बऱ्याच जखमा झाल्या. पहाटे रुमालाने हातकडी झाकून लिफ्ट मागत फुलंब्री गाठले. तो गावाकडेच गेल्याच्या दाट संशयातून गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक विशाल बोडखे, सहायक फौजदार सतीश जाधव, संजय गावंडे, बाळू नागरे हे त्याच्या मागावर हाेते. सायंकाळी विरमगाव फुलंब्री रस्त्यावरच बोडखे यांनी त्याला पकडून पुन्हा अटक केली.

Web Title: Placed a handkerchief on the handcuffs, slept in a sugarcane farm at night; The absconding accused of rape was found in Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.