रोहयोच्या कामांच्या लेबर बजेटची आखणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:04 AM2021-07-08T04:04:47+5:302021-07-08T04:04:47+5:30

औरंगाबाद : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत २०२२-२३ या आर्थिक वर्षात रोहयो कामांच्या लेबर बजेटची आखणी करण्याची सूचना ...

Plan the labor budget for Rohyo's work | रोहयोच्या कामांच्या लेबर बजेटची आखणी करा

रोहयोच्या कामांच्या लेबर बजेटची आखणी करा

googlenewsNext

औरंगाबाद : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत २०२२-२३ या आर्थिक वर्षात रोहयो कामांच्या लेबर बजेटची आखणी करण्याची सूचना राज्याचे मृद, जलसंधारण व रोहयो विभागाचे अप्पर मुख्य सचिव नंदकुमार यांनी विभागातील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना बुधवारी केली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत समृद्धी लेबर बजेट २०२२-२३ च्या अनुषंगाने विभागीय आयुक्तालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अपर मुख्य सचिव नंदकुमार बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर , रोहयोचे आयुक्त शंतनू गोयल, जि.प.सीईओ डॉ. मंगेश गोंदावले, जालनाचे प्रताप सवडे, परभणीचे शिवानंद टाकसाळे, नांदेडच्या वर्षा ठाकूर, हिंगोलीचे आर.बी. शर्मा, लातूरचे अभिनव गोयल, बीडचे अजित कुंभार, उस्मानाबादचे राहुल गुप्ता, उपआयुक्त समीक्षा चंद्राकर, उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, कृषी अधिकारी पी.एस.शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र अहिरे यांची होती. सचिव नंदकुमार म्हणाले, रोजगार हमी योजनेअंतर्गत अधिकचे काम देऊन दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. आयुक्त गोयल म्हणाले, रोहयोत प्रत्येक जिल्ह्याने आपल्या जिल्ह्यात जास्त मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत.

प्रत्येक कुटुंबाला १ लाख नफा मिळावा

गावातील प्रत्येक कुटुंबाला नरेगाच्या माध्यमातून वर्षाला निव्वळ नफा एक लाख रुपयांपर्यंत मिळायला हवा यासाठी सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गावपातळीवर नियोजन करावे. त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीला पाहिजे तेव्हा काम देण्यात येऊन त्यांची आर्थिक उन्नती साधावी, अशा सूचना नंदकुमार यांनी यावेळी केल्या.

Web Title: Plan the labor budget for Rohyo's work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.