टंचाई निवारणार्थ तालुका स्तरावर आराखडा
By Admin | Published: March 24, 2017 11:52 PM2017-03-24T23:52:21+5:302017-03-24T23:52:58+5:30
लातूर गेल्या तीन वर्षांपासून टंचाईच्या सर्वाधिक झळा सहन करणाऱ्या लातूर तालुक्यातील गावांना यंदा पावसामुळे चांगला दिलासा मिळाला आहे़
आशपाक पठाण लातूर
गेल्या तीन वर्षांपासून टंचाईच्या सर्वाधिक झळा सहन करणाऱ्या लातूर तालुक्यातील गावांना यंदा पावसामुळे चांगला दिलासा मिळाला आहे़ तरीही गतवर्षीचा अनुभव लक्षात घेता तालुका प्रशासनाने १ कोटी ८८ लाख रुपयांचा कृती आराखडा तयार केला आहे़
लातूर तालुक्यात ७२ टँकरद्वारे गतवर्षी पाणीपुरवठा करण्यात आला होता़ पाऊस चांगला झाल्यामुळे अनेक गावातील विंधन विहिरी, विहिरीला पाणी आहे़ याशिवाय मांजरा नदीकाठच्या गावांनाही नदीपात्रात पाणी असल्यामुळे चांगलाच दिलासा मिळाला आहे़ अद्याप तालुक्यातून पाणीटंचाईसाठी एकाही ग्रामपंचायतीचा प्रस्ताव पंचायत समितीकडे आलेला नाही़ तरीही खबरदारी म्हणून प्रशासनाने कृती आराखडा तयार करून ठेवला असल्याचे गटविकास अधिकारी दार्इंगडे यांनी सांगितले़