नियोजन समितीची रणधुमाळी सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 12:34 AM2017-08-23T00:34:55+5:302017-08-23T00:34:55+5:30

जिल्हा नियोजन समितीवर स्थानिक स्वराज्य संस्थामधून पाठविण्यात येणाºया प्रतिनिधीमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात वाढ झाली असून जिल्हा परिषदेचे ५ तर महापालिकेचे २ सदस्य वाढणार आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला असून मतदारांची प्राथमिक यादी प्रसिद्ध करण्यात आली असून या मतदारयादीवर आक्षेपाची २३ आॅगस्ट ही अंतिम मुदत राहणार आहे.

Planning committee started | नियोजन समितीची रणधुमाळी सुरु

नियोजन समितीची रणधुमाळी सुरु

googlenewsNext

अनुराग पोवळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: जिल्हा नियोजन समितीवर स्थानिक स्वराज्य संस्थामधून पाठविण्यात येणाºया प्रतिनिधीमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात वाढ झाली असून जिल्हा परिषदेचे ५ तर महापालिकेचे २ सदस्य वाढणार आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला असून मतदारांची प्राथमिक यादी प्रसिद्ध करण्यात आली असून या मतदारयादीवर आक्षेपाची २३ आॅगस्ट ही अंतिम मुदत राहणार आहे.
नांदेड जिल्हा नियोजन समितीच्या ४० सदस्यांची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. २०११ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या लक्षात घेऊन नियोजन समितीच्या सदस्यांमध्ये वाढ झाली आहे. ७ सदस्य वाढले असून त्यात जिल्हा परिषदेचे ५ तर महापालिकेचे २ सदस्य राहणार आहेत. नांदेड जिल्हा नियोजन समिती ही एकूण ५० सदस्यांची आहे. त्यात पालकमंत्री हे समितीचे अध्यक्ष तर जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हाधिकारी, राज्यपाल नामनिर्देशीत १ सदस्य, विधिमंडळ नामनिर्देशीत सदस्य २ तसेच राज्य शासनाचे पदसिद्ध ४ सदस्य आहेत. तर उर्वरित सदस्य निवडून द्यावे लागणार आहेत. या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे २८, नगरपरिषदांचे ४, महापालिकेचे २ आणि नगरपंचायतींमधून १ सदस्य निवडून द्यावयाचा आहे.
या निवडणुकीसाठी नांदेड जिल्हा परिषद, नांदेड महापालिका, किनवट नगरपरिषद, हदगाव नगरपरिषद, मुदखेड नगरपरिषद, भोकर, उमरी, धर्माबाद, बिलोली, कुंडलवाडी, लोहा, कंधार, मुखेड आणि देगलूर नगरपरिषद तसेच अर्धापूर, माहूर, हिमायतनगर आणि नायगाव नगरपंचायतींमध्ये निवडून आलेल्या सदस्यांच्या नावाची प्राथमिक यादी १९ आॅगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या मतदारयादीवर आक्षेप किंवा हरकत घ्यायची असेल तर त्यांना २३ आॅगस्टची अंतिम मुदत देण्यात आली आहे. मतदारयादी अंतिम होताच जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला जाणार आहे. सप्टेंबरच्या पहिल्या अथवा दुसºया आठवड्यात या निवडणुका होतील, अशी चिन्हे आहेत.
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निवडणुकीत काँग्रेसला मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीतही काँग्रेस आपलाच वरचष्मा राखण्याचा प्रयत्न करणार आहे. तर विरोधक एकत्र येऊन काँग्रेसला रोखण्याची आपली नेहमीच खेळी खेळणार का? हाही प्रश्न पुढे आला आहे.

Web Title: Planning committee started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.