नियोजनाचा विषय :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:03 AM2021-04-23T04:03:26+5:302021-04-23T04:03:26+5:30

श्रीकांत पोफळे करमाड : औरंगाबाद तालुक्यात १ फेब्रुवारीपासून आजपर्यंत एकूण ३८४२ रुग्ण आढळले असून यापैकी २९३५ रुग्ण कोरोनामुक्त, ...

Planning topic: | नियोजनाचा विषय :

नियोजनाचा विषय :

googlenewsNext

श्रीकांत पोफळे

करमाड : औरंगाबाद तालुक्यात १ फेब्रुवारीपासून आजपर्यंत एकूण ३८४२ रुग्ण आढळले असून यापैकी २९३५ रुग्ण कोरोनामुक्त, तर ३५ मृत्यू झालेले आहेत. तालुक्यातील पूर्व भागात कुंभेफळ ते करमाड परिसरात जम्बो कोविड केअर सेंटर उभारण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

तालुक्यातील बजाजनगर, वाळूज परिसरातील सिडको महानगर, वडगाव कोल्हाटी या परिसरात औद्योगिक वसाहती आहेत. एकट्या बजाजनगमध्ये १२७५ असे सर्वाधिक रुग्ण आहेत. सोबत वडगाव कोल्हाटी व सिडको महानगर या तिन्ही भागात मिळून २१४१ रुग्ण आढळले आहेत. याशिवाय तालुक्यातील पूर्व भागात पिसादेवी १६२, कुंभेफळ ९८, सावंगी ८८, शेंद्रा एमआयडीसी ८३, कुबेर गेवराई ६६, करमाड ४७, लाडसावंगी ४५, अंजनडोह ४० असे कोरोना रुग्ण आढळले आहेत. कोरोनाची चाचणी करण्यासाठी सर्वच आरोग्य केंद्रात स्वॅब देण्याची व्यवस्था असून गावांतही ती उपलब्ध करून दिली जाते.

तालुक्यात एकूण १७९ खेडी असून त्यापैकी १०८ गावांत कोरोना रुग्ण आढळले आहेत. ७१ गावांनी कोरोनाला वेशीवर रोखले आहे. कोरोनामुळे आरोग्य व्यवस्था कोलमडली असून स्वॅब दिला की रिपोर्ट येण्यास कमीत कमी २४ तास लागतात. तात्काळ रिपोर्टसाठी औरंगाबादला जावे लागते. ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांना चिकलठाणा येथील मिनी घाटीत पाठविण्यात येते. मात्र कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्यांसाठी करमाड परिसरात जम्बो कोविड सेंटर उभारण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

चौकट

गेवराई कुबेरचा ग्राऊंड रिपोर्ट

गेवराई कुबेर या ३३० कुटुंबे असलेल्या गावाची लोकसंख्या २१०० आहे. कोरोनाच्या दहशतीने जवळपास नागरिक शेतवस्तीवर राहण्यास गेल्यामुळे गाव ओस पडले आहे. लाडसावंगी प्रा. आ. केंद्रांतर्गत येणाऱ्या या गावात १५ दिवसांपूर्वी कोरोना रुग्ण आढळला होता. १५ एप्रिल रोजी ५० जणांच्या तपासणीत २६ रुग्ण आढळले होते. आजरोजी गावात १५ दिवसांत ६६ जणांना लागण झालेली आहे. यात चौघांचा मृत्यू झाला आहे.

--

फोटो : औरंगाबाद तालुक्यातील गेवराई कुबेर या गावातील नागरिक कोरोनाच्या धास्तीने शेतवस्तींवर राहण्यास गेल्याने गाव असे ओस पडले आहे.

220421\22_2_abd_12_22042021_1.jpg

औरंगाबाद तालुक्यातील गेवराई कुबेर या गावातील नागरिक कोरोनाच्या धास्तीने शेतवस्तींवर राहण्यास गेल्याने गाव असे ओस पडले आहे.

Web Title: Planning topic:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.