झाडे लावा, सृष्टी वाचवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 11:54 PM2017-08-14T23:54:03+5:302017-08-14T23:54:03+5:30
प्रत्येकाने झाड लावून जोपासना करण्याचे आवाहन सिनेअभिनेता सयाजी शिंदे याने केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी झाडांची नितांत गरज आहे.झाडांच्या कत्तलीमुळे निसर्गाचा ºहास होत आहे. झाडांमुळे सजीवांना आॅक्सीजन मिळतो. पैसे देऊन आॅक्सीजन व आनंद विकत घेता येत नाही. जितकी झाडे असतील, तितके सृष्टीचे आरोग्य चांगले राहील. म्हणून प्रत्येकाने झाड लावून जोपासना करण्याचे आवाहन सिनेअभिनेता सयाजी शिंदे याने केले.
पालवण येथे डोंगर परिसरात शेकडो विद्यार्थ्यांनी ६ हजार झाडे लावली. यावेळी सयाजी शिंदे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी राजेंद्र मस्के, शिवराम घोडके, डॉ. प्रदीप शेळके, राजू शिंदे, अनिल शेळके, वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. वृक्षारोपण अभियान तीन तास चालले. वृक्ष संगोपनाचा संकल्प विद्यार्थ्यांनी यावेळी केला.