स्कूल ऑफ बुद्धिझमने केले वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:04 AM2021-09-03T04:04:50+5:302021-09-03T04:04:50+5:30
अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर झिने होते. सूत्रसंचालन माजी विद्यार्थिनी श्वेता शेजुळ हिने केले. सचिव नीलेश झिने यांनी यशस्वी व्यक्तींची ...
अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर झिने होते. सूत्रसंचालन माजी विद्यार्थिनी श्वेता शेजुळ हिने केले. सचिव नीलेश झिने यांनी यशस्वी व्यक्तींची उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले व या शाळेने सुरू केलेल्या ‘इनलाईटमेंट क्लासरूम’ या उपक्रमाबद्दल माहिती दिली. तसेच धम्माची शिकवण, व्यक्तिमत्त्व विकास, भाषण कला, करिअर मार्गदर्शन करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. प्रा. अरुण गवई व यशपाल नवगिरे यांनी पर्यावरणावरील गीत सादर केले. कार्यक्रमास दादा वाकोडे, सुधाकर झिने, राजेंद्र नन्नावरे, दांडगे यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सृष्टी गवई, मानसी वेलदोडे, अभिजित गवई, सुमेध कंकाळ, सिद्धांत गवई, पूजा पाखरे, समृद्धी पंडित, विशाखा पाखरे, अनिकेत किर्दक, जयेश वरघट, प्रशिक तायडे, अशोक किर्दक, पंडितराव तुपे, रविकुमार तायडे, राजू वरघट यांनी परिश्रम घेतले.