रक्षा विसर्जन करून ११ वृक्षांची केली लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:05 AM2021-06-20T04:05:26+5:302021-06-20T04:05:26+5:30
अंभई : कोरोनाने दोन वर्षांत आपल्याला भरपूर शिकविले. ऑक्सिजनच्या तुटवड्याने अनेकांचा जीव गेला. याला मुख्य कारण म्हणजे झालेली जंगलतोड. ...
अंभई : कोरोनाने दोन वर्षांत आपल्याला भरपूर शिकविले. ऑक्सिजनच्या तुटवड्याने अनेकांचा जीव गेला. याला मुख्य कारण म्हणजे झालेली जंगलतोड. त्यामुळे पर्यावरणाच्या संवर्धनासाठी सिल्लोड तालुक्यातील घटांब्री येथील पंडित परिवाराने पुढाकार घेतला. घरातील वृद्धाचे निधन झाल्यानंतर त्यांच्या रक्षा पाण्यात विसर्जन न करता घटांब्री शिवारात विसर्जन करून त्या ठिकाणी विविध जातींच्या ११ वृक्षांची लागवड करून संवर्धनाचा संकल्प केला.
घटांब्री येथील शामराव महादू पंडित यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांनी रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम कोणत्याही धार्मिक स्थळावर न घेण्याचा निर्णय घेतला. शेतशिवारात रक्षाविसर्जन करून नारळ, पिंपळ, चिकू, पेरू, निंब, डाळिंब, उंबर अशा अकरा वृक्षांचे लागवड केले. यावेळी सुमित पंडित, प्रकाश पंडित, विष्णू पंडित, देविदास पंडित, भास्कर पंडित, कल्पेश पंडित, पुरुषोत्तम बोर्डे, शकुंतलाबाई पंडित, निर्मलाबाई बोर्डे, विमल पंडित, मीराबाई पंडित, लता पंडित,
रेणुका पंडित यांची उपस्थिती होती.
फोटो : वीरगाव शिवारात वृक्षारोपण करताना पंडित कुटुंबीय.
190621\sanjaykumar v. kadi_img-20210619-wa0097_1.jpg
वृक्षारोपण करताना पंडीत कुटुंबिय