अंत्यविधीच्या राखेत लावली आंब्याची झाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 12:11 AM2017-11-05T00:11:24+5:302017-11-05T00:11:28+5:30
अंत्यसंस्कारानंतर तयार होणाºया राखेचे नदीमध्ये विसर्जन न करता याच राखेमध्ये आंब्याची झाडे लावून जिंतूर तालुक्यातील अकोली येथील नातेवाईकांनी वेगळा पायंडा निर्माण केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जिंतूर : अंत्यसंस्कारानंतर तयार होणाºया राखेचे नदीमध्ये विसर्जन न करता याच राखेमध्ये आंब्याची झाडे लावून जिंतूर तालुक्यातील अकोली येथील नातेवाईकांनी वेगळा पायंडा निर्माण केला आहे.
जिंतूर तालुक्यातील अकोली येथील अंशीरामजी रानोजी रोकडे यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी गावचे सरपंच पद भूषविले. १९६८ साली तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी अकोली येथे भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी १० एकर जमिनीवर गावाचे पुनर्वसन करण्याची मागणी करून पुनर्वसन करून घेतले. त्यांच्या कुटुंबांमध्ये आजही ४३ सदस्य एकत्रित राहतात.
मृत्यूनंतर अस्थिंचे विसर्जन न करता झाडाच्या बुंध्याला राख टाकावी, यामुळे नदीतील पाणी दूषित होणार नाही, अशी भूमिका अंशीराम रोकडे यांची होती. त्यांच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी त्यांचा आदर्श घेत अस्थी विसर्जन न करता अंत्यसंस्काराच्या राखेमध्ये आंब्याची झाडे लावून वेगळा पायंडा निर्र्माण केला आहे.