१५ दिवसांत प्लास्टिकमुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 11:46 PM2017-10-04T23:46:34+5:302017-10-04T23:46:34+5:30
शहर हागणदारीमुक्तीनंतर आता प्लास्टिकमुक्तीकडे नेण्यासाठी पालिका प्रशासन कंबर कसणार आहे. आगामी पंधरा दिवसांत शहरातील विक्रेत्यांनी प्लास्टिकचा साठा संपवून टाकावा. त्यानंतर वापर होत असल्यास तो जप्त करून दंडात्मक कारवाईचा इशाराही मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहर हागणदारीमुक्तीनंतर आता प्लास्टिकमुक्तीकडे नेण्यासाठी पालिका प्रशासन कंबर कसणार आहे. आगामी पंधरा दिवसांत शहरातील विक्रेत्यांनी प्लास्टिकचा साठा संपवून टाकावा. त्यानंतर वापर होत असल्यास तो जप्त करून दंडात्मक कारवाईचा इशाराही मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी दिला.
हिंगोली शहरात काही दिवसांपूर्वी प्लास्टिकमुक्तीसाठी प्रयत्न केले जात होते. त्यात अनेक विक्रेते व दुकानदारांवरही कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर विक्रेत्यांनी प्लास्टिकच्या पिशव्या आणने बंद केले होते. शिवाय दुकानदार व व्यापारीही प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये सामान देत नसल्याचे दिसून येत होते. त्यामुळे प्रत्येकजण घरूनच पिशवी घेवून खरेदीसाठी बाहेर पडताना दिसत होता. काही दिवसांनी या मोहिमेकडे हागणदारीमुक्तीमुळे दुर्लक्ष झाले अन् व्यापाºयांनी प्लास्टिकचा मुक्त वापर सुरू केला आहे. त्यामुळे पुन्हा कचºयात प्लास्टिकचे प्रमाण वाढले आहे. शहरातील नाल्याही तुंबत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा हिंगोलीत प्लास्टिकमुक्तीसाठी पालिकेने पथकांची स्थापना करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या पथकांमार्फत प्लास्टिक वापराबाबत दुकानांची तपासणी केली जाणार आहे. येत्या पंधरा दिवसांत जुना साठा संपविणे अनिवार्य आहे. त्यानंतर कोणतेही कारण न सांगता प्लास्टिक वापर बंद करावा लागेल. अन्यथा प्लास्टिक जप्त करून संबंधितांना दंडा लावला जाणार आहे. व्यापाºयांनी ही बाब गांभिर्याने घेण्याचे आवाहनही पाटील यांनी केले.