लाव रे डीजे! यंदा १५ दिवस वाद्य वाजविण्यास परवानगी, जाणून घ्या तारखा
By विकास राऊत | Published: January 3, 2024 12:03 PM2024-01-03T12:03:23+5:302024-01-03T12:03:36+5:30
या दिवशी ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत वापरास परवानगी
छत्रपती संभाजीनगर : जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी २०२४ मध्ये ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक नियम शिथिल करण्यासाठी १५ दिवस निश्चित केले आहेत. या दिवशी ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत वापरास परवानगीचे आदेश जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी जारी केले आहेत.
शिवजयंती सोमवार, १९ फेब्रुवारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती रविवार, १४ एप्रिल, श्रीगणेश चतुर्थी शनिवार, ७ सप्टेंबर, ज्येष्ठा गौरीपूजन बुधवार, ११ सप्टेंबर, अनंत चतुर्दशी मंगळवार १७ सप्टेंबर, ईद ए मिलाद सोमवार, १६ सप्टेंबर, अष्टमी शुक्रवार ११ ऑक्टोबर, नवमी शनिवार १२ ऑक्टोबर, दिवाळी (लक्ष्मीपूजन) शुक्रवार १ नोव्हेंबर, ख्रिसमस बुधवार २५ डिसेंबर, मंगळवार ३१ डिसेंबर. याशिवाय उर्वरित चार दिवस राखीव असून कार्यक्रमांच्या गरजेनुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने सूट दिली जाईल, असे आदेशात नमूद आहे.