सुखद ! औरंगाबादच्या बटाट्याला परराज्यातून मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 07:56 PM2020-12-28T19:56:04+5:302020-12-28T19:58:01+5:30

यंदा फुलंब्री, सिल्लोड, कन्नड भागातील शेतकऱ्यांनीही मोठ्या प्रमाणात बटाट्याचे उत्पादन घेतले आहे.

Pleasant! Demand for Aurangabad potatoes from other states | सुखद ! औरंगाबादच्या बटाट्याला परराज्यातून मागणी

सुखद ! औरंगाबादच्या बटाट्याला परराज्यातून मागणी

googlenewsNext
ठळक मुद्दे १२ ते १५ रुपये प्रति किलोने स्थानिक बटाटा विकल्या जात आहे. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, कर्नाटक,आंध्रप्रदेश या राज्यातून मागणी वाढली

औरंगाबाद : जिल्ह्यात बटाट्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे. आता या औरंगाबादी बटाट्याला परराज्यातून मागणी सुरू झाली आहे. कडाक्याची थंडी पडली असतानाही बाजरीला मागील वर्षीच्या तुलनेत ४० टक्क्याने मागणी घटली आहे.

मागील आठवड्यात मोठी भाववाढ झाली नाही. जाधववाडी आडत बाजरात इंदाैरहून ७० टन पेक्षा जास्त नवीन बटाट्याची आवक होत आहे. तसेच यंदा फुलंब्री, सिल्लोड, कन्नड भागातील शेतकऱ्यांनीही मोठ्या प्रमाणात बटाट्याचे उत्पादन घेतले आहे. या औरंगाबादी बटाट्याला उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, कर्नाटक,आंध्रप्रदेश या राज्यातून मागणी वाढली आहे. १२ ते १५ रुपये प्रति किलोने स्थानिक बटाटा विकल्या जात आहे. तर इंदाैरचा बटाटा ८ ते १८ रुपये किलोने विकला जात आहे. भाजीमंडईत ३० ते ४० रुपये किलोने बटाटा मिळत आहे. सध्या ६० टन कांदा आडत बाजारात विक्रीसाठी येत आहे. होलसेलमध्ये २० ते २२ रुपये तर किरकोळ विक्रीत ३० ते ४० रुपये किलोने विकला जात आहे.

शहरात पारा कमालीचा घटला आहे. हिवाळ्यात गरम, पौष्टिक बाजरीची भाकरी जास्त खाल्ली जाते पण मागील वर्षीच्या तुलनेत यंदा बाजरीची विक्री ४० टक्काने घटली आहे.

खाद्य तेलाच्या किमती स्थिर : २१ डिसेंबर २७ डिसेंबर
सोयाबीनतेल ११५ रू - ११५रू
सरकीतेल १०५ रू - १०५ रू
पामतेल १०५रू - १०५रू
सूर्यफुलतेल १२५ रू - १२५ रू

डाळी : २२ डिसेंबर २७ डिसेंबर ( किलो)
हरभराडाळ ६६-६८ रू -  ६०-६२ रू
तूरडाळ ९०-९२ रू - ८६-८८ रू
मूगडाळ ९६-९८ रू - ९६-९८ रू
उडीदडाळ ९६-९८ रू - ९६-९८ रू


नवीन गहू, ज्वारीची प्रतीक्षा
बहुतांश नवीन तांदूळ, नवीन बाजरी बाजारात दाखल झाले आहेत. नवीन गहू व ज्वारी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आवक सुरू होईल.
- निलेश सोमाणी, होलसेल व्यापारी

खाद्यतेलाची विक्री घटली
सोयाबीन, सरकी, पामतेलाचे भाव पहिल्यांदा शंभरीपार झाले आहेत. ८० टक्के ग्राहक हेच खाद्य तेल खरेदी करतात. भाववाढीने खाद्य तेलाची विक्री निम्म्याने घटली आहे.
- जगन्नाथ बसैये, खाद्य तेल विक्रेते

बटाट्याला भाव कमी
होलसेलमध्ये ४० ते ५० रुपये किलो भाव गेल्याने आम्ही बटाट्याची लागवड केली. पण आता १२ ते १५ रुपये किलोने बटाटा विकावा लागत आहे.
- संजय खरात, शेतकरी

Web Title: Pleasant! Demand for Aurangabad potatoes from other states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.