दिवाळीनंतर देशात अराजकता माजविण्याचा डाव : आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 06:27 AM2023-09-30T06:27:11+5:302023-09-30T06:27:52+5:30
मणिपूर, गोध्राचे ताजे उदाहरण विसरता कामा नये, आरक्षणावर रान उठवून जनतेचे डोके भडकविणाऱ्या सरकारने वेगळे राजकारण सुरू केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर : सरकारच्या पायाखालील वाळू सरकू लागल्याने दिवाळीनंतर देशात अराजकता माजविण्याचा सरकारचा डाव आहे. लोकसभा निवडणुका नागरिकांनी शांततेत पार पाडण्याचे आवाहन पत्रकार परिषदेत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती संभाजीनगर येथे केले.
मणिपूर, गोध्राचे ताजे उदाहरण विसरता कामा नये, आरक्षणावर रान उठवून जनतेचे डोके भडकविणाऱ्या सरकारने वेगळे राजकारण सुरू केले आहे. सरकारमध्ये हिंदूंवरच हल्ला चढविला जाणार असल्याने मुस्लीमच नव्हे, तर शीख, जैनदेखील यात भरडले जाण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
आरक्षणाच्या मुद्यावर आंबेडकर म्हणाले की, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावताच आरक्षण देण्यात यावे. आम्हाला सत्ता द्या, आम्ही आरक्षण देऊ. निवडणुकीत शिवसेना आघाडीसोबतच राहणार असून, स्वतंत्र लढण्याचे ठरले, तर ४८ जागांवर उमेदवार देऊ असेही ते म्हणाले.