खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लूट

By Admin | Published: March 24, 2017 11:47 PM2017-03-24T23:47:27+5:302017-03-24T23:48:04+5:30

बीड तूर खरेदीस सुरुवात झाली असली तरी मापात पाप होत असल्याने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे.

The plunder of the farmers at the shopping center | खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लूट

खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लूट

googlenewsNext

राजेश खराडे बीड
अद्यापपर्यंत बारदाणाशिवाय जागेअभावी तुरीची अनेक वेळा रखडली होती. अनंत अडचणींवर मात करून तूर खरेदीस सुरुवात झाली असली तरी मापात पाप होत असल्याने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. काट्यावर वजन होत असतानाच हमाल-मापाड्यांकडून शेतकऱ्यांची तूर काढून घेतली जात असल्याचे ‘लोकमत’च्या स्टिंगमधून समोर आले आहे.
कृउबाच्या प्रवेशद्वारातून खरेदी केंद्रावरील वजन काट्यावर तूर जाण्यासाठी दोन-तीन दिवसांचा कालावधी लागत आहे. वाढत्या उन्हामुळे वजनात घट ही नैसर्गिक असली तरी काट्यावर मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांचा मालच काढून घेतला जात आहे. वजनापूर्वी तुरीची चाळणी केली जाते. चाळण्यातून पडणारी तूर मापात न धरता थेट हमाल स्वत:च्या पदरात पाडून घेत आहेत. तुरीचे वजन होत असताना शेतकऱ्यांपेक्षा हमाल-मापाड्यांचीच लगबग अधिक प्रमाणात पाहावयास मिळते. एका कट्ट्यामागे जवळपास दीड ते दोन किलो तूर काढली जात आहे. शिवाय बारदाण्याच्या वजनापोटी १ किलो अधिकची तूर घेतली जात आहे. त्यामुळे ५० किलोमागे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना तब्बल ३ किलोचा फटका बसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने सुरू केलेली ही केंद्रे त्यांच्यासाठी मारक ठरत आहेत.

Web Title: The plunder of the farmers at the shopping center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.