नळासाठीच्या अभय योजनेतही लूट

By Admin | Published: August 11, 2015 12:46 AM2015-08-11T00:46:10+5:302015-08-11T00:59:21+5:30

औरंगाबाद : महापालिकेने वर्षभरापूर्वी शहरातील संपूर्ण पाणीपुरवठ्याची यंत्रणा औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीकडे सोपविली. कंपनीने शहरातील अनधिकृत

Plunder for the tapes | नळासाठीच्या अभय योजनेतही लूट

नळासाठीच्या अभय योजनेतही लूट

googlenewsNext


औरंगाबाद : महापालिकेने वर्षभरापूर्वी शहरातील संपूर्ण पाणीपुरवठ्याची यंत्रणा औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीकडे सोपविली. कंपनीने शहरातील अनधिकृत नळ शोधण्यासाठी १ आॅगस्टपासून व्यापक मोहीम हाती घेतली असून, एका नळ कनेक्शनधारकांकडून कंपनी तब्बल ४ हजार १५० रुपये वसूल करीत आहे. पूर्वी महापालिका अनधिकृत नळ कनेक्शन अधिकृत करण्यासाठी अभय योजनेत फक्त १७५० रुपये घेत होती.
औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीने अनधिकृत नळांचा शोध घेण्यासाठी खाजगी संस्थांची मदत घेतली असून, शहरातील विविध वसाहतींमध्ये अनधिकृत नळांचा शोध घेण्यात येत आहे. ज्या नागरिकांकडे नळाची कागदपत्रे नाहीत, त्यांच्याकडून जागेवरच ४ हजार १५० रुपये घेत आहेत. बाँडपेपर व इतर कागदपत्रांसाठीही नागरिकांकडून पैसे घेण्यात येत आहेत.

Web Title: Plunder for the tapes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.