कोरेगाव-भीमा दंगल आणि मराठा आंदोलनादरम्यान आंदोलकांवरील गुन्हे परत घेण्यास पोलीस अनुकूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 08:08 PM2018-11-15T20:08:56+5:302018-11-15T20:11:10+5:30
काही गुन्हे सशर्त परत घेण्यास पोलीस प्रशासनाने हिरवा कंदिल असल्याचा अहवाल पोलीस प्रशासनाने शासनाला सादर केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली.
औरंगाबाद : कोरेगाव-भीमा दंगल आणि मराठा आंदोलनादरम्यान आंदोलकांवर नोंद झालेले काही गुन्हे सशर्त परत घेण्यास पोलीस प्रशासनाने हिरवा कंदिल असल्याचा अहवाल पोलीस प्रशासनाने शासनाला सादर केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली. आंदोलनादरम्यान पोलिसांवरील हल्ले आणि दहा लाखांपेक्षा अधिक नुकसानीचे गुन्हे परत घेऊ नका,असेही अहवालात नमूद आहे.
मराठा आंदोलन आणि कोरेगाव-भीमा दंगलीप्रकरणी पोलिसांनी नोंदविलेले गुन्हे परत घ्यावे,अशी मागणी आंदोलकांकडून शासनाकडे करण्यात आली. त्यानंतर शासनाने औरंगाबाद पोलीस आयुक्तांकडून याविषयी अभिप्राय मागवला होता. त्यानुसार शहर पोलिसांनी शासनास अहवाल नुकताच सादर केला. ज्या आंदोलकांनी दहा लाखांपर्यंतच्या खाजगी आणि सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान केले आहे. त्यांच्याकडून नुकसानभरपाई घ्यावी आणि नंतरच त्यांचे गुन्हे परत घ्यावे. सरकारी अधिकारी, कर्मचाºयांना झालेली मारहाण आणि दहा लाखांपेक्षा अधिक नुकसानीप्रकरणी दाखल गुन्हे परत घेऊ नये, अशी शिफारस अहवालात केली आहे.