दिवसाढवळ्या पेट्रोलपंप लुटणारी विधीसंघर्षग्रस्त मुले पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2021 03:39 PM2021-11-17T15:39:26+5:302021-11-17T15:44:40+5:30

सीसीटीव्ही कॅमेरा तपासला तेव्हा एका मुलाने ही रक्कम पळविल्याचे दिसले.

Police arrest children involved in money laundering from petrol pumps | दिवसाढवळ्या पेट्रोलपंप लुटणारी विधीसंघर्षग्रस्त मुले पोलिसांच्या ताब्यात

दिवसाढवळ्या पेट्रोलपंप लुटणारी विधीसंघर्षग्रस्त मुले पोलिसांच्या ताब्यात

googlenewsNext

औरंगाबाद : आजाद चौकातील एका पेट्रोल पंपाच्या केबिनमधून दोन दिवसांपूर्वी १.३३ लाखांची रक्कम घेऊन पळालेल्या दोन विधीसंघर्षग्रस्त मुलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ४३ हजार रुपये जप्त करण्यात जिन्सी पोलिसांना यश आले.

दि. १३ नोव्हेंबर रोजी दिवसभरातील पंपावरील जमा झालेले १ लाख ३३ हजार ५८० रुपये मोजून व्यवस्थापकांनी केबिनबमध्ये ठेवले होते. पंपाची मोटार खराब झाल्याने व्यवस्थापक मुदस्सीर खान शकील खान शहरात मोटार दुरूस्तीसाठी जाऊन आले. रात्री १० वाजता पैसे चोरी झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा तपासला तेव्हा एका मुलाने ही रक्कम पळविल्याचे दिसले. जिन्सी पोलीस ठाण्यात रविवारी तक्रार देण्यात आली .

सीसीटीव्ही फुटेजमुळे गुन्हा उघड..
पोलीस निरीक्षक व्ही. एम. केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक गोकुळ ठाकूर, कर्मचारी संपत राठोड, नंदुसिंह परदेशी, सुनील जाधव, नंदकुमार चव्हाण, संतोष बमनावत यांच्या टीमने सीसीटीव्ही फुटेजच्याआधारे १३ वर्षीय मुलाला ताब्यात घेतले.

दोघात वाटून घेतली रक्कम
ताब्यात घेतलेल्या मुलाने सांगितले की, ही रक्कम त्याने व त्याच्या १४ वर्षीय साथीदाराने वाटून घेतली. ४३ हजार रुपये त्या मुलाच्या घरातून जप्त करण्यात आले. दुसऱ्याच्या घरात एक़ हजार रुपये सापडले. इतर रकमेची माहिती अद्याप पोलिसांना मिळालेली नाही. उर्वरित मोठ्या रकमेविषयी तो मुलगा पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत असून, ज्यांची नावे तो सांगत आहे. त्या लोकांचा काही संबंध जुळत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ते पोलिसांची दिशाभूल करीत आहेत. त्या दोघांनाही बाल न्यायमंडळासमोर उभे केले होते. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गोकुळ ठाकूर करीत आहेत.

Web Title: Police arrest children involved in money laundering from petrol pumps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.