पोलिसांनी घेतली गुन्हेगारांची ‘परेड’

By Admin | Published: June 7, 2016 11:44 PM2016-06-07T23:44:15+5:302016-06-07T23:49:33+5:30

औरंगाबाद : शहरात वाहनचोऱ्या, घरफोड्या, खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्याला आळा घालण्यासाठी पोलिसांनी सोमवारी रात्री संपूर्ण शहरात ‘आॅपरेशन आॅल आऊट’ राबविले.

Police arrest 'criminals' parade | पोलिसांनी घेतली गुन्हेगारांची ‘परेड’

पोलिसांनी घेतली गुन्हेगारांची ‘परेड’

googlenewsNext

औरंगाबाद : शहरात वाहनचोऱ्या, घरफोड्या, खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्याला आळा घालण्यासाठी पोलिसांनी सोमवारी रात्री संपूर्ण शहरात ‘आॅपरेशन आॅल आऊट’ राबविले. त्याअंतर्गत ‘रेकॉर्ड’वरील तब्बल अडीचशे गुन्हेगारांची धरपकड करण्यात आली. त्यांची मग आयुक्तालयात मंगळवारी दुपारी चांगलीच ‘हजेरी’ घेण्यात आली. नीट राहा, सुधरा, गुन्हे करताल तर याद राखा गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा दम पोलीस आयुक्तांनी गुन्हेगारांना भरला.
गेल्या काही दिवसांपासून शहरात खुनाचे सत्र सुरूआहे. एकापाठोपाठ एक खुनाच्या घटना घडत आहेत. या शिवाय वाहन चोरांनी तर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. दररोज शहरातून दोन, तीन वाहने चोरी जात आहेत. घरफोड्यांचे सत्रही थांबण्यास तयार नाही. हे गुन्हे करणारे कोण आहेत, हे निश्चित पोलिसांना समजेनासे झाले आहे.
रात्रभर गुन्हेगारांची धरपकड
निश्चित गुन्हेगार काही सापडत नसल्याने पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी पुन्हा एकदा गुन्हेगारांची ‘हजेरी’ घेण्याचे ठरविले. त्यासाठी सर्वच पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना, गुन्हेशाखेला रेकॉर्डवरील गुन्हेगार पकडून आणण्याचे आदेश जारी करण्यात आले. सोमवारी रात्री या ‘आॅपरेशन आॅल आऊट’सुरुवात झाली. प्रत्येक पोलीस ठाण्याला २० गुन्हेगार पकडून आणण्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार रात्रभर आपापल्या हद्दीत जंगजंग पछाडत पोलिसांनी एकूण २५० गुन्हेगारांची धरपकड केली.
काय फरक पडणार?
आठ महिन्यांपूर्वीही पोलीस आयुक्तांनी अशाच पद्धतीने रेकॉर्डवरील सर्वच गुन्हेगारांना पकडून आयुक्तालयात आणून त्यांची चांगलीच ‘हजेरी’ घेतली होती. मात्र, त्यानंतर गुन्हेगारी काही कमी झाली नव्हती. आता पुन्हा मंगळवारी तोच पाढा गिरविण्यात आला. मंगळवारच्या ‘दमबाजी’ने गुन्हेगारांमध्ये किती फरक पडतो, हे लवकर दिसून येईल.
आयुक्तालयात
भरली ‘शाळा’
‘आॅपरेशन आॅल आऊट’मध्ये पकडलेल्या सर्व गुन्हेगारांना सकाळी पोलीस आयुक्तालयातील अलंकार सभागृहात आणून बसविण्यात आले. मग दुपारी या सर्वांना एका ठिकाणी बसवून पोलीस आयुक्त अमितेशकुमार, उपायुक्त संदीप आटोळे, सहायक आयुक्त खुशालचंद बाहेती यांनी त्यांची ‘परेड’ घेतली. एका एका गुन्हेगाराला उभा करून आयुक्तांनी त्याची कुंडली जाणून घेतली आणि मग सर्वांना नीट राहा, यापुढे गुन्हे कराल तर गाठ आमच्याशी आहे. गंभीर कायदेशीर परिणाम भोगावे लागतील’ अशा शब्दात आयुक्तांनी या गुन्हेगारांना दम भरला.

Web Title: Police arrest 'criminals' parade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.