एअरगनसह विद्यापीठात फोटोसेशन करणाऱ्या चार तरुणांना पोलिसांनी झटापट करून पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:04 AM2021-05-29T04:04:36+5:302021-05-29T04:04:36+5:30
बॉटनीकल गार्डनमध्ये सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास सात ते आठ तरुण घुसले. सुरक्षारक्षक बोरकर यांनी त्यांना हटकले आणि आत प्रवेश ...
बॉटनीकल गार्डनमध्ये सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास सात ते आठ तरुण घुसले. सुरक्षारक्षक बोरकर यांनी त्यांना हटकले आणि आत प्रवेश करण्यास मनाई केली. यावेळी तरुणांनी त्यांना धमकावून आत प्रवेश केला. यानंतर ते फोटो मोबाइलवर व्हिडिओ तयार करू लागले आणि छायाचित्रे काढू लागले. ही बाब बोरकर यांनी त्यांच्या वरिष्ठांना आणि पोलिसांना फोन करून कळवली. पोलीस निरीक्षक सचिन सानप आणि अन्य कर्मचाऱ्यांनी विद्यापीठात धाव घेतली. तेव्हा पोलिसांना पाहून हे तरुण पळून जाऊ लागले असता, पोलिसांनी झटापट करून चौघांना पकडले आणि पोलीस ठाण्यात नेले. बेगमपुरा ठाण्यात रात्री उशिरापर्यंत त्यांची कसून चौकशी केली जात होती. एअरगन कशासाठी आणली. एअरगन सोबत बाळगण्याचे कारण काय, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता.