१५ आरोपींच्या अटकेला पोलिसांची चालढकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 12:20 AM2017-08-25T00:20:20+5:302017-08-25T00:20:20+5:30

येथील पुरवठा विभागाच्या गोदामात झालेल्या २८ कोटी रुपयांच्या धान्य घोटाळा प्रकरणात ३७ पैकी १५ आरोपींच्या अटकेला गेल्या वर्षभरापासून पोलिसांकडून चालढकल केली जात असून, शासनालाही पोलिसांकडून याबाबत तकलादू अहवाल देण्यात आला असल्याची बाब समोर आली आहे़

 Police arrests 15 accused | १५ आरोपींच्या अटकेला पोलिसांची चालढकल

१५ आरोपींच्या अटकेला पोलिसांची चालढकल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील पुरवठा विभागाच्या गोदामात झालेल्या २८ कोटी रुपयांच्या धान्य घोटाळा प्रकरणात ३७ पैकी १५ आरोपींच्या अटकेला गेल्या वर्षभरापासून पोलिसांकडून चालढकल केली जात असून, शासनालाही पोलिसांकडून याबाबत तकलादू अहवाल देण्यात आला असल्याची बाब समोर आली आहे़
शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात ४ कोटी ९७ लाख रुपयांच्या शासकीय गोदामातील धान्याचा अपहार झाल्या प्रकरणी १३ आॅगस्ट २०१६ रोजी प्रारंभी दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता़ त्यानंतर या घटनेचा तपास जसजसा पुढे गेला़ तसतशी आरोपींची संख्या तब्बल ३७ वर गेली अन् धान्य घोटाळाचा आकडा २८ कोटी ३४ लाख ७४ हजार ५६० रुपयांपर्यंत गेला़ या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत २१ आरोपींना अटक केली आहे़ त्यातील सर्वच आरोपींना जामीन मिळालेला आहे़ उर्वरित १६ पैकी एक आरोपी मयत आहे़ राहिलेल्या १५ आरोपींना पोलिसांनी अद्यापही अटक केलेली नाही़ अटक न केलेल्या आरोपींमध्ये ९ शासकीय अधिकाºयांचा समावेश आहे़ याशिवाय अन्य ६ आरोपींनाही पोलिसांनी अद्याप अटक करण्याची तसदी घेतलेली नाही़ या संदर्भात नुकत्याच झालेल्या विधान मंडळाच्या सभागृहात शासकीय अधिकाºयांच्या अटकेबाबत आ़ बाबाजानी दुर्राणी यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती़ त्या अनुषंगाने शासनाने जिल्हाधिकाºयांमार्फत माहिती मागविली होती़ जिल्हाधिकाºयांनी याबाबत पोलीस अधीक्षकांकडे माहिती मागितली़ त्यानुसार अतिरिक्त पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी १८ जुलै रोजी जिल्हा पुरवठा अधिकाºयांना कारवाईच्या अनुषंगाने पत्र पाठविले़ त्यामध्ये संपूर्ण प्रकरणाचा इतिहास देण्यात आला असून, ९ शासकीय अधिकारी व कर्मचाºयांना गुन्ह्यात अटक करणे बाकी असल्याचे नमूद केले आहे़ त्यापैकी संतोष वेणीकर, दिलीप कच्छवे, ज्योती पवार, चित्रा देशमुख, प्रकाश यंदे या ५ आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळले आहेत़ तसेच चित्रा देशमुख व प्रकाश यंदे यांचे अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानेही फेटाळले असल्याचे नमूद करण्यात आले आहे़ या गुन्ह्यात आतापर्यंत १२ लाख १५ हजार रुपये रोख व २४ लाख ९५ हजार रुपयांची वाहने आणि प्रत्येकी ५० किलोचे १०४ गहू, तांदूळ, साखरेचे पोते तसेच २२ कट्टे तांदूळ असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ सदरचा गुन्हा हा आर्थिक स्वरुपाचा असून, त्याची व्याप्ती मोठी आहे़ गुन्ह्यात कोणत्याही आरोपीची गय करण्यात आली नसून, या पुढेही यात आरोपींकडून दस्ताऐवज पुरावा तसेच साक्ष पुरावा हस्तगत करण्यात येत आहे़ दस्ताऐवज पुराव्यात जप्त करण्यात आलेल्या अभिलेख्यांची पडताळणी करून आरोपीविरूद्ध ठोस पुरावा हस्तगत करण्याचे काम कसोशीने (?) चालूच आहे़ आजपावेतो २१ स्वस्तधान्य दुकानदार व व्यापारी आरोपींना अटक करण्यात आली असून, इतर आरोपींविरूद्धही भक्कम पुरावे प्राप्त होत आहेत़ उर्वरित स्वस्तधान्य दुकानदार व व्यापारी यांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून या शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याविरूद्ध आणखी भक्कम पुरावा मिळण्याची खात्री असल्याने या उर्वरित आरोपींना अटक केल्यानंतर इतर सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाºयांना अटक करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे़, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे़ असे असले तरी इतर आरोपींना कधी अटक करणार? त्यांच्या शोधासाठी काय प्रयत्न केले? याबाबतची कोणतीही माहिती या अहवालात देण्यात आलेली नाही़ आरोपींविरूद्ध भक्कम पुरावे असल्याची बाब अहवालात नमूद असतानाही अटक मात्र का केली जात नाही? असा सवालही या निमित्ताने उपस्थित होत आहे़

Web Title:  Police arrests 15 accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.