पोलीस हल्ला प्रकरण; ५५ जणांवर गुन्हा दाखल
By Admin | Published: April 16, 2017 11:01 PM2017-04-16T23:01:07+5:302017-04-16T23:04:59+5:30
अंबाजोगाई : जयंती मिरवणुकीत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याची घटना शुक्रवारी घडली होती. याप्रकरणी ५५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अंबाजोगाई : जयंती मिरवणुकीत डॉल्बी सिस्टीमचा आवाज कमी करण्यास सांगितल्याने पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याची घटना शुक्रवारी घडली होती. याप्रकरणी ५५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आतापर्यंत १३ आरोपींना अटक झाली आहे.
सहायक निरीक्षक अब्दुल माजिद अब्दुल कादर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जीवे मारण्याच्या उद्देशाने पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर काठीने, लोखंडी रॉडने आणि तीक्ष्ण हत्याराने हल्ला करून मारहाण, शिवीगाळ आणि दमदाटी केल्याच्या कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला. शर्ती व अटींचे पालन करण्याबाबतच्या नोटिसचा भंग करून शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. या हल्ल्यात सहाय्यक निरीक्षक माजिद शेख यांच्यासह निरीक्षक श्रीकांत हरगबाळ आणि महिला कर्मचारी छाया वाघमारे गंभीर जखमी झाल्या होत्या. तपास निरीक्षक सुरेंद्र गंदम हे करीत आहेत. (वार्ताहर)