पोलिसांत तक्रार केल्याने मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 11:36 PM2019-03-16T23:36:52+5:302019-03-16T23:37:02+5:30
सेफ्टी टँकचे दूषित पाण्याची नागरी वसाहतीत विल्हेवाट लावल्याची तक्रार केल्याचा राग धरुन आरोपींनी दोघांना बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी रात्री रांजणगाव शेणपुंजी येथे घडली.
वाळूज महानगर : सेफ्टी टँकचे दूषित पाण्याची नागरी वसाहतीत विल्हेवाट लावल्याची तक्रार केल्याचा राग धरुन आरोपींनी दोघांना बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी रात्री रांजणगाव शेणपुंजी येथे घडली. यात एकाचे डोके फुटले असून, दुसऱ्यास गंभीर दुखापत झाली आहे.
शंकर सूर्यवंशी याने ५ फेब्रुवारीला रांजणगावातील एकतानगरच्या कमानीजवळ सेफ्टी टँकचे दूषित पाणी खाली केल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे या प्रकरणी नागरिकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात निवेदन सादर करुन सेफ्टी टॅकचे दूषित पाणी खाली करणाऱ्याविरुध्द तक्रार केली होती. याचा राग धरुन शंकर सूर्यवंशी व त्याच्या साथीदारांनी शुक्रवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास तक्रारदारांना शिवीगाळ केली. यातून झालेल्या हाणातारीत अशोक किर्तीकर, कांचनदास किर्तीकर हे जखमी झाले आहेत. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.