पारधमध्ये जवानाकडून पोलिसांना मारहाण
By Admin | Published: March 5, 2017 12:22 AM2017-03-05T00:22:11+5:302017-03-05T00:26:02+5:30
पारध : भोकरदन तालुक्यातील पारध येथील बारावीच्या परीक्षा केंद्रावर सुटीवर आलेल्या सैन्यातील जवानाने दोन पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केली.
पारध : भोकरदन तालुक्यातील पारध येथील बारावीच्या परीक्षा केंद्रावर सुटीवर आलेल्या सैन्यातील जवानाने दोन पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण करुन जखमी केल्याची घटना शनिवारी दुपारी जनता महाविद्यालय परिसरात घडली. या प्रकरणी पोलीस कॉन्सटेबल विकास जाधव यांच्या फिर्यादीवरून जवान सौरभ रमेश महाले यांच्याविरूध्द सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
शनिवारी दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान जनता विद्यालय केंद्रावर राज्यशास्त्राचा पेपर सुरु आसताना धामणगाव (जि.बुलडाणा) येथील रहिवासी जम्मू येथे सैन्य दलात कर्तव्यावर आहे. सध्या सुटीवर गावाकडे आलेला सौरभ रमेश महाले हा त्या परीक्षा केंद्रावर त्याच्या भावाला कॉपी देण्याच्या उद्देशाने आला असताना तेथे कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी विकास जाधव आणि पो. कॉ. सोनवणे यांनी त्यास हटकले यावरून पोलीस कर्मचारी आणि जवान महाले यांच्या बाचाबाची झाली. त्यातूनच महाले याने पोलीस जाधव यांच्या मारहाण केल्याने ते जखमी झाले.
या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांना मारहाण झाल्याची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरल्याने परिसरात बघ्यांनी गर्दी केली होती. सहकाऱ्याच्या मदतीने जखमी जाधव याला धाड (जि.बुलडाणा) येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. (वार्ताहर)