दुकान फोडून मोबाइल चोरणा-यास सिडको पोलिसांनी केले जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 12:36 AM2017-11-29T00:36:23+5:302017-11-29T00:36:32+5:30

टीव्ही सेंटर परिसरातील जिजाऊ चौकात असलेले मोबाइल दुकान चोरट्यांनी फोडत ३ लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना शुक्रवारी (दि. २४) मध्यरात्री घडली पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमे-याची चाचपणी करून एकास अटक करण्यात यश आले आहे.

 The police broke into the shop and the mobile chorana was seized by the CIDCO police | दुकान फोडून मोबाइल चोरणा-यास सिडको पोलिसांनी केले जेरबंद

दुकान फोडून मोबाइल चोरणा-यास सिडको पोलिसांनी केले जेरबंद

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : टीव्ही सेंटर परिसरातील जिजाऊ चौकात असलेले मोबाइल दुकान चोरट्यांनी फोडत ३ लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना शुक्रवारी (दि. २४) मध्यरात्री घडली होती. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात मोबाइल दुकान मालकाने अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. सिडको पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमे-याची चाचपणी करून एकास अटक करण्यात यश आले आहे. विनोद अशोक हिवाळे (२१, रा. हर्सूल) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव
आहे.
याविषयी सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास प्रजापती यांनी माहिती दिली की, टीव्ही सेंटर परिसरातील जिजाऊ चौकात अण्णासाहेब एकनाथ पवार (४६, रा. एन १२, हडको) यांचे मोबाइलचे दुकान आहे. गुरुवारी (दि. २३) रोजी दुकानमालक पवार यांनी रात्री नित्यनेमाप्रमाणे दुकान रात्री १० दहा वाजता बंद केले. मध्यरात्री तीनच्या सुमारास दोन चोरट्यांनी मोबाइल दुकानाचे शटर तोडून प्रवेश करीत दुकानातील ५४ मोबाइल व २६ हजार ७०० रुपये रोख रक्कम असा ३ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. हा प्रकार दुकानमालक पवार यांना सकाळी लक्षात आला. त्यांनी तात्काळ घटनेची माहिती सिडको पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली.
५४ पैकी ४० मोबाइल काढून दिले...
विनोद हिवाळे यास अटक केल्यानंतर त्याने चोरीतील दडवून ठेवलेले ४० मोबाइल पोलिसांना काढून दिले. या प्रकरणातील दुसरा आरोपी आकाश महादेव गावडा फरार असून, तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रजापती यांनी दिली. याविषयी अधिक तपास फौजदार भरत पाचोळे करीत आहेत.

Web Title:  The police broke into the shop and the mobile chorana was seized by the CIDCO police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.