ईव्हीएम प्रकरणात मनपात धडकले पोलीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:56 AM2017-11-15T00:56:06+5:302017-11-15T00:56:44+5:30

इलेक्ट्रॉनिक वोटींग मशीनमध्ये फेरफार करुन देतो त्यासाठी १५ लाख रुपयांची मागणी करणाºया तरुणाला मंगळवारी पोलिसांनी जेरबंद केल्यानंतर या प्रकरणात महापालिकेतही पोलिसांनी दिवसभर चौकशी केली.

Police in the case of EVM case | ईव्हीएम प्रकरणात मनपात धडकले पोलीस

ईव्हीएम प्रकरणात मनपात धडकले पोलीस

googlenewsNext
ठळक मुद्देमनपात चौकशी : निवडणूक धामधुमीत काहींंचा कानाडोळा; काहींना इंग्रजीतील ‘एसएमएस’ समजलाच नाही

नांदेड :
महापालिका निवडणुकीवेळी सचिन दत्ता राठोड (रा. दयाळ धानोरा ता. किनवट) सध्या शहरातील सुंदरनगर येथे राहत असलेल्या तरुणाने काही उमेदवारांना मोबाईलवरुन मेसेज पाठवून ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन देतो, यासाठी १० लाख रुपये अगोदर आणि निकालानंतर ५ लाख रुपये द्या, अशी आॅफर असलेले मेसेज मोबाईलवर पाठविले होते. १५ लाखांत मतदान यंत्रात फेरफार करुन विजयी केले जाईल, अशा आशयाचा तो एसएमएस होता. चोरीचे सीमकार्ड वापरुन हिमाचल प्रदेश निवडणूक आयोगाच्या नावेही हिमाचल प्रदेशातील ४३ जणांना मेसेज पाठविले होते. तिथेही मतदान यंत्रात फेरफार करुन उमेदवारांना विजयी करण्याचे आमिष दाखविले होते. याप्रकरणी हिमाचल प्रदेशात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासात मोबाईलचे लोकेशन तेलंगणा, आंध्र प्रदेश राज्यातील दाखविले होते. या प्रकरणाची माहिती हिमाचल प्रदेश पोलिसांनी नांदेड पोलिसांनाही दिली होती. यावरुन नांदेड पोलिसांनी सचिन राठोड याला ताब्यात घेतले. सचिन राठोड याने ज्या ज्या उमेदवारांना मेसेज पाठविले त्यांचीही पोलिसांनी कसून चौकशी केली आहे. महापालिका निवडणूक विभागाचे प्रमुख असलेल्या मनपा आयुक्तांना मंगळवारी पोलिसांनी सदर प्रकरणाची माहिती दिली. या प्रकरणात कायदेशीर बाबी तपासल्या जाव्यात, असे आयुक्तांनी पोलिसांशी झालेल्या चर्चेत स्पष्ट केले. प्राप्त माहितीनुसार, महापालिकेतील अनेक उमेदवारांनी मोबाईलवरील हे मेसेज पाहिलेच नाहीत. तर काहींनी इंग्रजीतील हे मेसेज पाहिले, परंतु त्यांना त्याचा अर्थ समजला नसल्याने त्यांनीही कानाडोळा केला. मात्र प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी मंगळवारी पहाटेपासूनच आपला मोर्चा संबंधित उमेदवारांकडे वळवला होता. यातील काहींना पहाटेच ताब्यात घेवून चौकशी केल्याचेही सूत्रांनी सांगितले. महापालिकेतही पोलिसांचे एक पथक मंगळवारी दिवसभर चौकशीत होते. या मेसेज प्रकरणाची माहिती पुढे आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यातही ते ३१ उमेदवार कोणते याचीही उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. यातील किती उमेदवार निवडून आलेत याची चर्चा दिवसभर सुरू होती.
दरम्यान, नांदेड पोलिसांनी जेरबंद केलेल्या सचिन राठोड बाबत हिमाचल प्रदेशातील शिमला पोलिसांंना माहिती दिली असून शिमला पोलीस एक ते दोन दिवसांत नांदेडमध्ये दाखल होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना यांनी दिली़ दरम्यान, आरोपी राठोड याने इस्लापूर येथे सीम चोरी केले होते़ त्या प्रकरणात इस्लापूर ठाण्यात त्याच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती पोनि़ संदीप गुरमे यांनी दिली़

Web Title: Police in the case of EVM case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.