पोलीस आयुक्तालयाची नवी इमारत ठरली ‘आयकॉनिक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 01:23 AM2018-07-08T01:23:12+5:302018-07-08T01:23:33+5:30

शहर पोलीस आयुक्तालयाच्या नव्या इमारतीवर अजिंठा-वेरूळ लेण्यांचा आणि निजामकालीन वास्तुरचनेचा प्रभाव आहे. २० टक्के वीज बचत करणाऱ्या या प्रशासकीय इमारतीच्या डिझाईनमुळे ती ‘आयकॉनिक’ ठरली आहे. अशीच इमारत आम्हालाही बांधून द्या, अशा प्रकारची मागणी विविध पोलिस आयुक्तलयाकडून होत आहे.

 Police commissioner's new building was 'iconic' | पोलीस आयुक्तालयाची नवी इमारत ठरली ‘आयकॉनिक’

पोलीस आयुक्तालयाची नवी इमारत ठरली ‘आयकॉनिक’

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहर पोलीस आयुक्तालयाच्या नव्या इमारतीवर अजिंठा-वेरूळ लेण्यांचा आणि निजामकालीन वास्तुरचनेचा प्रभाव आहे. २० टक्के वीज बचत करणाऱ्या या प्रशासकीय इमारतीच्या डिझाईनमुळे ती ‘आयकॉनिक’ ठरली आहे. अशीच इमारत आम्हालाही बांधून द्या, अशा प्रकारची मागणी विविध पोलिस आयुक्तलयाकडून होत आहे.
याबाबतची माहिती पोलीस गृहनिर्माण मंडळाचे महासंचालक बिपीन बिहारी यांनी येथे शनिवारी दिली.
काय आहेत वैशिष्ट्ये ?
तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या प्रयत्नांमुळे पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीसाठी शासनाने २२ कोटी रुपये निधी दिला. सुमारे दीड वर्षाच्या कालावधीत आयुक्तालयाची प्रशासकीय इमारत उभी राहिली. या भव्य वास्तूमध्ये अजिंठा-वेरूळ, निजामकालीन आणि पारंपरिक वास्तूशैली, अशी तिहेरी वास्तू वैशिष्ट्ये दिसून येतात. तेथे काम करणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी आवश्यक अशा सर्व बाबींचा अंतर्भाव या इमारतीत केला आहे. इमारतीच्या छतावर सोलार प्लँट आहे. यातून इमारतीसाठी लागणारी २० टक्के वीज उपलब्ध होणार आहे. यासोबतच भविष्याचा वेध घेऊन इमारतीच्या नूतनीकरणासाठी व्यवस्था ठेवली आहे. प्रत्येक मजला २० हजार चौरस फुटांचा असून, त्यात सहा मोठ्या हॉलचा अंतर्भाव आहे. संपूर्ण इमारतीमध्ये असे १८ हॉल आहेत. हे हॉल प्रत्येकी २ हजार चौरस फुटांचे आणि कॉलमविरहित आहेत. तसेच शुद्ध हवा आणि स्वच्छ सूर्यप्रकाशासाठी प्रत्येक मजल्यावर चौक आहेत. कार्यालयात मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे येणे असल्याने त्यांना थांबण्यासाठी मोकळी जागा ठेवण्यात आली.
कुठे काय?
तळमजला :
नागरी सुविधा केंद्र, स्वागत कक्ष, वायरलेस, पोलीस कंट्रोल रूम, पासपोर्ट युनिट, बॉम्बशोधक आणि कँटीन.
गरजा लक्षात घेऊन बांधणी
नव्या इमारतीचा आराखडा तयार करण्याआधी सर्व पोलिसांची एक बैठक घेतली. यातून त्यांना काय हवे, नको ते लक्षात आले. यातूनच या इमारतीची निर्मिती करण्यात आली आहे.
- ज्योती कुलकर्णी, अधीक्षक अभियंता
‘आयकॉनिक’ इमारत
इमारत उभारतानाच यातून मराठवाड्याचा सार प्रतीत व्हावा अशी इच्छा होती. यात अजिंठा- वेरूळ आणि निजामकालीन वास्तुरचनेचा प्रभाव असून, मराठवाड्यातील नागरिकांना अभिमान वाटावा अशी रचना करण्यात आली आहे.
- शरद महाजन, वास्तुविशारद

Web Title:  Police commissioner's new building was 'iconic'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.