मराठा महिलांबद्दल अपशब्द काढणाऱ्या पोलिस निरीक्षक किरण बकाले विरुद्ध मराठा क्रांती मोर्चाची पोलिसांत तक्रार
By बापू सोळुंके | Published: September 15, 2022 11:15 PM2022-09-15T23:15:00+5:302022-09-15T23:15:41+5:30
या अधिकाऱ्यावर गुन्हा नोंदविण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने सिडको पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री देण्यात आली.
बापू सोळुंके/ औरंगाबाद: जळगाव येथील पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले याने मराठा समाजातील महिलांविषयी आक्षेपार्ह विधान करून त्यांचा विनयभंग केला आहे. शासनाच्या वरिष्ठ पदावरील या अधिकाऱ्यावर गुन्हा नोंदविण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने सिडको पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री देण्यात आली.
24 तासांत गुन्हा न नोंदविल्यास मुख्यमंत्र्याना काळे झेंडे दाखवू असा इशारा तक्रारींनंतर देण्यात आला. मराठा क्रांती मोर्चा चे कार्यकर्ते गणेश उगले पाटील, आप्पासाहेब कुढेकर, सुनील कोटकर, प्रा. चंद्रकांत भराट यांनी सिडको पोलिस ठाणे गाठून पोलिस निरीक्षक बकले विरुद्ध तक्रार दिली. पोलिस निरीक्षक बकाले यांने महिलांविषयी काढलेल्या अपशब्दमुळे मराठा समाजातील माता भगिनीना अपमानास्पद वाटत आहे.
समाजातील लोकांची मानसिकतेला चीड आणणारे हे वक्तव्य आहे. यामुळे तात्काळ गुन्हा नोंदवा अशी मागणी करण्यात आली. पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी ही तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत जळगाव च्या पोलिस अधीक्षकांना पाठविण्यात येणार असल्याचे सांगून येथे तात्काळ गुन्हा नोंदविण्यास नकार दिला. याविषयी त्यांनी लेखी दिल्याने कार्यकर्ते रात्री उशिरा ठाण्यातून बाहेर पडले. 24 तासात बकले यास बडतर्फ करुन त्याच्यावर गुन्हा नोंदवा अन्यथा आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध करू असा इशारा उगले यांनी दिला.