पोलिसांनीच केले पोलिसांचे स्टिंग, औरंगाबादमधील घटना, वाळू वाहतूकदारांकडून हप्तावसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 12:58 AM2017-11-12T00:58:24+5:302017-11-12T00:58:27+5:30

रात्रीच्या वेळी वाळूची वाहतूक करणा-या वाहनचालकांना अडवून त्यांच्याकडून वसुली करणारे वाहतूक पोलीस कोण, हे पाहण्यासाठी पोलिसांनीच स्टिंग आॅपरेशन केले आणि ती छायाचित्रे वरिष्ठांना सादर केली.

Police did the sting of police, incidents in Aurangabad, installment of recovery from sand transporters | पोलिसांनीच केले पोलिसांचे स्टिंग, औरंगाबादमधील घटना, वाळू वाहतूकदारांकडून हप्तावसुली

पोलिसांनीच केले पोलिसांचे स्टिंग, औरंगाबादमधील घटना, वाळू वाहतूकदारांकडून हप्तावसुली

googlenewsNext

औरंगाबाद : रात्रीच्या वेळी वाळूची वाहतूक करणा-या वाहनचालकांना अडवून त्यांच्याकडून वसुली करणारे वाहतूक पोलीस कोण, हे पाहण्यासाठी पोलिसांनीच स्टिंग आॅपरेशन केले आणि ती छायाचित्रे वरिष्ठांना सादर केली. सहायक पोलीस आयुक्तांनी या तक्रारींची चौकशी करून नुकताच अहवाल सादर केल्याचे सूत्रांनी सांगितले.
वाळूज एमआयडीसी परिसरात वाळूची वाहतूक करणा-या ट्रॅक्टरसह अन्य वाहनांना पोलीस अडवितात आणि त्यांच्याकडून वसुली करतात, अशी तक्रार वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सी. डी. शेवगण यांना प्राप्त झाली होती. याबाबत त्यांनी चौकशी केली असता रात्री ९ वाजेनंतर वाहतूक पोलिसांची ड्यूटी समाप्त होत असल्याने रात्रीच्या वेळी वाळू वाहतुकदारांकडून हप्ता वसूल करणारे ते नसल्याचे त्यांना सांगण्यात आले.
परिणामी, वाहनचालकाची अडवणूक करणारे नेमके कोण आहेत, याबाबतची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनीच या प्रकरणाचे स्टिंग आॅपरेशन केले.

पोलीस आयुक्तांना अहवाल सादर
या स्टिंग आॅपरेशनमध्ये एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला वाहनचालक वाळूची वाहतूक करणाºया एका ट्रॅक्टरचालकास अडवून त्याच्याशी बोलत असल्याची छायाचित्रे एसीपी शेवगण यांना प्राप्त झाली. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी छावणी विभागाचे सहायक आयुक्त डी. एन. मुंढे यांना याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार मुंढे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून मुंढे यांनी ८ नोव्हेंबर रोजी पोलीस आयुक्तांना अहवाल सादर केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

 

Web Title: Police did the sting of police, incidents in Aurangabad, installment of recovery from sand transporters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस