पोलिसांनी केला सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 12:12 AM2017-09-10T00:12:22+5:302017-09-10T00:12:22+5:30
पोळा, बकरीईद व गणेशोत्सव हे मुख्य सण शांततेत पार पाडण्यास प्रशासनास मदत केल्याबद्दल नागरिकांचे आभार मानून त्यांचा सत्कार केल्याचा आगळावेगळा सोहळा शुक्रवारी वसमत शहर पोलीस ठाण्यात पहावयास मिळाला. सर्व स्तरातील उपस्थित यामुळे भारावून गेले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत : पोळा, बकरीईद व गणेशोत्सव हे मुख्य सण शांततेत पार पाडण्यास प्रशासनास मदत केल्याबद्दल नागरिकांचे आभार मानून त्यांचा सत्कार केल्याचा आगळावेगळा सोहळा शुक्रवारी वसमत शहर पोलीस ठाण्यात पहावयास मिळाला. सर्व स्तरातील उपस्थित यामुळे भारावून गेले होते.
वसमत शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी आजवर कधी न अनुभवलेला सोहळा पहावयास मिळाला. नागरिकांच्या सत्कारानंतर आगामी उत्सवातही अशीच कामगिरी करण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक उदयसिंह चंदेल, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुभाष लालपोतू, मौलाना मंजूर अहेमद, अॅड. राजर्षी वैजवाडे, अॅड. शेख मोसीन, सुभाष अंबेकर, दीपक कुल्थे, इसाक पठाण, प्रा.नामदेव दळवी, शेख अलीमोद्दीन, मोनू दरक, मुंडे, शेख सत्तार आदींसह ज्येष्ठ नागरिक, व्यापारी, पत्रकार, महिला, गणेश मंडळाचे कार्यकर्ते, मशीदीचे मौलाना, इमाम, सामान्य नागरिक, पोलीस कर्मचारी आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी पोनि चंदेल यांनी सर्व वसमतकरांनी सहकार्य केल्यानेच सण, उत्सव पार पडण्यास मदत झाल्याचे सांगितले. आपले गाव आपण शांत ठेवायचे व सामाजिक सलोखा वृद्धीगत करायचा ही संकल्पना वसमतकरांनी चांगल्या पद्धतीने जोपासल्याचेही त्यांनी सांगून सर्वांचे आभार व्यक्त केले. सूत्रसंचालन राजू सिद्धीकी यांनी केले. तर आभार फौजदार नागोराव मोरे यांनी मानले.