पोलिसांचा हवेत गोळीबार
By Admin | Published: February 22, 2016 12:26 AM2016-02-22T00:26:15+5:302016-02-22T00:39:23+5:30
तामलवाडी : आरोपीला अटक करण्यासाठी आलेल्या सोलापूर पोलिसांच्या पथकावर संतप्त जमावाने तलवारी, काठ्या, दगडं घेऊन पाठलाग सुरू केल्याने स्वसंरक्षणासाठी
तामलवाडी : आरोपीला अटक करण्यासाठी आलेल्या सोलापूर पोलिसांच्या पथकावर संतप्त जमावाने तलवारी, काठ्या, दगडं घेऊन पाठलाग सुरू केल्याने स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला़ ही घटना शुक्रवारी दुपारी वडगाव (काटी़ ता़तुळजापूर) येथे घडली असून, या प्रकरणी १२ जणाविरूध्द तामलवाडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरच्या फौजार चावडीचे पोलीस पथक गुरनं १०९/१२ नुसार कलम ३०७ मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी शिवलाल सरदार काळे याला शोधण्यासाठी शुक्रवारी दुपारी वडगाव (काटी) शिवारातील पारधी वस्तीवर गेले होते़ मात्र, पथकातील तीन पोलीस अधिकारी, कर्मचारी पाहताच वस्तीमधील नागरिकांनी कुऱ्हाड, तलवार, दगड घेऊन ‘आता यांना जीवे मारून टाकू’ असे म्हणत पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा पाठलाग सुरू केला़ जमाव हत्यारासह पाठलाग करीत असल्याने पोलिसांनी हवेत दोन फैरी झाडल्या़ पोलिसांनी हवेत गोळीबार करताच जमाव तेथून पांगला़ त्यानंतर पोलिसांनी हरिष शामराव काळे व प्रल्हाद दगडू काळे (रा़ वडगाव काटी) या दोघांना ताब्यात घेतले़ याबाबत सोलापूर पोलीस ठाण्याचे सपोनि शिवाजी नाईक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवलाल सरदार काळे (रा़ कारंबा ता़उत्तर सोलापूर) हरिश शामराव काळे, प्रल्हाद दगडू काळे (रा़ वडगाव काटी) यांच्यासह १२ जणाविरुद्ध रात्री ११ वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या घटनेचा अधिक तपास पोउपनि सुरेश शिंदे हे करीत आहेत़ दरम्यान, ताब्यातील हरिष शामराव काळे व प्रल्हाद दगडू काळे (रा़ वडगाव काटी) या दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़
एकच पुंगळी सापडली
सोलापूर पोलीस ठाण्यातील पथकातील शिवाजी नाईक या अधिकाऱ्यांनी स्वसंरक्षणासाठी हवेत दोन गोळ्या झाडल्या़ घटनेनंतर तामलवाडी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला़ त्यावेळी गोळीबारातील एकाच गोळीची पुंगळी मिळाली़ त्यामुळे अनेक प्रश्न समोर येत आहेत़ तर गोळीबार करण्याची परिस्थिती नसताना, या
वस्तीवरील एकावरही पाच वर्षात कोणताही गंभीर गुन्हा तामलवाडी ठाण्यात नाही़ (वार्ताहर)