उपजिल्हाधिकाऱ्यांचा हरवलेला श्वान अवघ्या २४ तासांत शोधला पोलिसांनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:04 AM2021-06-06T04:04:21+5:302021-06-06T04:04:21+5:30
४ जून रोजी सायंकाळी त्यांचा लुफी नावाचा श्वान गायब झाल्याचे दिसताच सुशांत सुत्रावे यांनी सिडको ठाण्यात तक्रार अर्ज ...
४ जून रोजी सायंकाळी त्यांचा लुफी नावाचा श्वान गायब झाल्याचे दिसताच सुशांत सुत्रावे यांनी सिडको ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. ही बाब सुत्रावे यांनी सहाय्यक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांना फोन करून कळविली. पोलिसांनी केलेल्या तपासांत दुचाकीस्वार तीन जण श्वान चोरून नेत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. सपोनि सोनवणे यांनी संशयित चोरट्यांचे फूटेज खबऱ्यांना पाठवले. तेव्हा हा माणूस वाहनचालक असून नारेगावात राहतो, असे त्यांना समजले. पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन पाहिले असता सुत्रावे यांचा लुफी नावाचा श्वान तेथे आढळून आला. हा श्वान पोलिसांनी ताब्यात घेतला आणि त्याचे छायाचित्र सुत्रावे यांच्या मोबाइलवर पाठवले असता, तो श्वान त्यांचाच असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर सुत्रावे कुटुंब पुंडलिकनगर ठाण्यात आले आणि श्वान घेऊन गेले. श्वान चोराविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंद नसल्यामुळे पोलिसांना त्याला अटक करता आली नाही.