पोलिस मित्र अ‍ॅपला जिल्ह्यात घरघर!

By Admin | Published: August 18, 2016 12:43 AM2016-08-18T00:43:18+5:302016-08-18T00:53:15+5:30

जालना : वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी माच महिन्यात सुरू करण्यात आलेल्या पोलिस मित्र अ‍ॅपला जिल्ह्यात प्रतिसाद मिळत नसल्याने बाब समोर आली आहे

Police friend app in the district! | पोलिस मित्र अ‍ॅपला जिल्ह्यात घरघर!

पोलिस मित्र अ‍ॅपला जिल्ह्यात घरघर!

googlenewsNext


जालना : वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी माच महिन्यात सुरू करण्यात आलेल्या पोलिस मित्र अ‍ॅपला जिल्ह्यात प्रतिसाद मिळत नसल्याने बाब समोर आली आहे. गत पाच महिन्यांत केवळ सातच तक्रारी नियंत्रण कक्षाला प्राप्त झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
पोलिस प्रशासनाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, यासाठी तत्त्कालीन पोलिस महासंचालक प्रविणकुमार दीक्षित यांच्या संकल्पनेतून पोलिस मित्र अ‍ॅप राज्यभर लाँच करण्यात आला. ज्या ठिकाणी गुन्ह्याचे प्रमाण अधिक आहे. तेथे हा अ‍ॅप सुरु करण्यात आला.
जिल्हा प्रशासनाने डिजीटल इंडियांतर्गत विशेष कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला आहे. त्यानंतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांनी जागतिक महिला दिनी म्हणजेच ८ मार्च रोजी महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस अ‍ॅप लाँच केला होता. यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला.
अ‍ॅपद्वारे नोंदविलेल्या तक्रारींसाठी संगणकाचे ज्ञान असलेल्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. ज्यांना मदतीची तात्काळ गरज आहे अशांसाठी हे अ‍ॅप सुरू करण्यात आले. गत पाच महिन्यांत केवळ सातच तक्रारी पोलिस नियंत्रण कक्षाला प्राप्त झालेल्या आहेत. त्यांचेही निरसन करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, पोलिस प्रशासनाने या अ‍ॅपबाबत जनजागृती केल्यास नागरिकांना या अ‍ॅपचे महत्व पटून नागरिक अ‍ॅपच्या वापराकडे वळतील असेही मोबाईलधारकांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
परिणामी सध्या या कक्षातील कर्मचाऱ्यांची इतरत्र बदली करण्यात आली आहे. सध्या या अ‍ॅपवर तक्रारी येतच नसल्याचे सांगण्यात येत असल्याने ते बंद पडण्याच्या मार्गावर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Police friend app in the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.