बँक व्यवस्थापक, सिक्युरिटी एजन्सीचालकांची पोलिसांनी घेतली बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:05 AM2020-12-24T04:05:31+5:302020-12-24T04:05:31+5:30
शहरातील वाढत्या चोऱ्या, घरफोड्यांतील चोरीचे सोने बँकांकडे तारण ठेवून चोरटे पैसे उकळतात. या घटना अलीकडे वाढल्या आहेत. गतवर्षी ...
शहरातील वाढत्या चोऱ्या, घरफोड्यांतील चोरीचे सोने बँकांकडे तारण ठेवून चोरटे पैसे उकळतात. या घटना अलीकडे वाढल्या आहेत. गतवर्षी वामन हरी पेठे ज्वेलर्समधील ६४ किलो सोने चोरी करून विक्री केल्याची घटना समोर आली होती. या पार्श्वभूमीवर विशेष शाखेने शहरातील बँक व्यवस्थापक आणि सुरक्षारक्षक यांची बैठक घेतली. यावेळी बोलताना सहायक आयुक्त बनकर म्हणाले की, सोने तारण ठेवून कर्ज घेणाऱ्या व्यक्तीची ऐपत काय आहे, याविषयी कर्ज देण्यापूर्वी शहानिशा करावी. त्याने गहाण ठेवण्यासाठी आणलेले सोन्याचे दागिने त्याच्याच मालकीचे आहेत का, याविषयी खात्री करावी, एटीएम मशीन चोरून नेण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. हे प्रकार टाळण्यासाठी एटीएम आणि बँकेत सुरक्षारक्षक नियुक्त करावेत. सुरक्षारक्षक नेमण्यापूर्वी त्याचे चारित्र्य पडताळणी पोलिसांकडून करूव घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. नियमांचे पालन न केल्यास गुन्हे नोंदविण्याचा इशारा त्यांनी दिला.