मंगळसूत्र, दुचाकी चोरी आणि रस्त्यावरील गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांची मॅरेथॉन नाकाबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:02 AM2021-02-10T04:02:11+5:302021-02-10T04:02:11+5:30
गतवर्षीपासून सुरू असलेले वाहन चोरी आणि मंगळसूत्र चोरीच्या घटनांचे सत्र नवीन वर्षातही थांबायला तयार नाही. घटना घडल्यानंतर पोलिसांकडून नाकाबंदी ...
गतवर्षीपासून सुरू असलेले वाहन चोरी आणि मंगळसूत्र चोरीच्या घटनांचे सत्र नवीन वर्षातही थांबायला तयार नाही. घटना घडल्यानंतर पोलिसांकडून नाकाबंदी केली जाते. याचा मात्र फारसा उपयोग होताना दिसत नाही. परिणामी मंगळसूत्र चोरी आणि दुचाकी चोरी करणारे मोकाट फिरत आहेत. वाढलेल्या घटनांमुळे शहरातील दुचाकीचालक त्यांच्या वाहनाबद्दल चिंतीत असतात. मंगळसूत्र चोरीला जाते की काय? या भीतीपोटी महिलांच्या मनातही चोरट्यांची धास्ती बसली आहे. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी मंगळवारी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत शहराच्या सर्वच रस्त्यांवर चौकाचौकात नाकाबंदी केली. पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, दीपक गिऱ्हे, पाच सहाय्यक पोलीस आयुक्त आणि शहरातील १७ पोलीस ठाण्यांतील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. प्रत्येक पोलीस ठाणेअंतर्गत पाच ठिकाणी बॅरिकेट्स लावून नाकाबंदी केली जात होती. येणारी - जाणारी संशयित वाहने अडवून ही वाहने तपासली जात होती. ज्या चालकाकडे वाहनाची कागदपत्रे नाहीत, अशी वाहने जप्त केली जात होती.
============
कोट
शहरातील मंगळसूत्र चोरी, दुचाकी चोरी आणि रस्त्यावरील मुली आणि महिलांची छेडछाड सबंधित गुन्हे रोखण्यासाठी मंगळवारी अचानक नाकाबंदी करण्यात आली. या नाकाबंदीत विना क्रमांक वाहन, बनावट क्रमांक असलेली वाहने आणि विना कागदपत्रांची वाहने जप्त करण्याचे निर्देश देण्यात आले होते. आजच्या सारखी कडक नाकाबंदी यापुढे केली जाणार आहे.
-- निकेश खाटमोडे पाटील, पोलीस उपायुक्त.
=====
शहरात अशी होती नाकाबंदी
नाकाबंदीचे पॉइंट - ६६
पोलीस ठाणे- १७
सहभागी पोलीस अधिकारी- १२५
सहभागी पोलीस - ६००
वाहतूक शाखेचे कर्मचारी- २००
गुन्हेशाखेचे सहभागी कर्मचारी- ३०
प्रत्येक ठाण्यांतर्गत नाकाबंदीचे पॉइंट- ४ ते ५
===============
(या बातमीत नाकाबंदीत किती लोकांवर काय कारवाई झाली याची चौकट मिळेल ) (फोटोसह )