विभागीय आयुक्तालयात पोलिसांची ‘मॉकड्रिल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:02 AM2021-05-31T04:02:56+5:302021-05-31T04:02:56+5:30
रविवारी सकाळी ११ ते ११.३० वाजेच्या सुमारास पोलिसांची एकामागून एक अशी अनेक वाहने सायरन वाजवत विभागीय आयुक्त कार्यालयात जात ...
रविवारी सकाळी ११ ते ११.३० वाजेच्या सुमारास पोलिसांची एकामागून एक अशी अनेक वाहने सायरन वाजवत विभागीय आयुक्त कार्यालयात जात होती. एरव्ही मंत्र्यांचा ताफा अनेकांनी पाहिला आहे; पण आज वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सारेच हातात आधुनिक शस्त्रे घेऊन धावताना पाहून काळजाचा ठोका चुकला. काही तरी फार मोठी घटना घडली असल्याचा तर्क तेथून जाणाऱ्या वाहनधारक आणि आजूबाजूच्या रहिवाशांची घाबरगुंडी उडाली. काहींनी फोनाफोनी करुन आप्तेष्ट, मित्रांना ही घटना सांगितली. मात्र, काही वेळातच ही मॉकड्रिल असल्याचे समजल्यानंतर तेथे उपस्थित नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
यावेळी वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त सुरेश वानखेडे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, सिटी चौक ठाण्याचे निरीक्षक संभाजी पवार आदींसह अनेक अधिकारी तसेच विविध पथकांतील पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.