टीडीआर घोटाळाप्रकरणी महापालिका अधिकाऱ्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे पोलिसांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 10:14 PM2018-11-29T22:14:09+5:302018-11-29T22:14:30+5:30
औरंगाबाद : बोगस टिडीआर घोटाळा प्रकरणात सिटीचौक पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास करणाºया अर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाशी संबंधित तीन अधिकारी आणि एका कर्मचाºयाला नोटीसा पाठवून दोन दिवसांत चौकशीसाठी हजर राहण्याचे बजावले. यात उपायुक्त वसंत निकम, उपअभियंता ए. बी. देशमुख, शाखा अभियंता एस. बी. राठोड आणि नगर रचना विभागातील आवक - जावक विभागाचा कारकुन मझहर यांचा समावेश आहे.
औरंगाबाद : बोगस टिडीआर घोटाळा प्रकरणात सिटीचौक पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास करणाºया अर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाशी संबंधित तीन अधिकारी आणि एका कर्मचाºयाला नोटीसा पाठवून दोन दिवसांत चौकशीसाठी हजर राहण्याचे बजावले.
यात उपायुक्त वसंत निकम, उपअभियंता ए. बी. देशमुख, शाखा अभियंता एस. बी. राठोड आणि नगर रचना विभागातील आवक - जावक विभागाचा कारकुन मझहर यांचा समावेश आहे.
रस्ता रुंदीकरणादरम्यान बाधित जागेचा मोबदला रोख स्वरुपात घेतल्यानंतर पुन्हा टीडीआर आणि रोख स्वरुपात महापालिकेकडून मोबदला घेण्याचा प्रयत्न झाला होता. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर तत्कालीन मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या आदेशाने याप्रकरणी सिटीचौक ठाण्यात दोन गुन्हे नोंद झाले होते. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हेशाखेकडे वर्ग करण्यात आला.
पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले हे तपास करीत आहेत.महापालिकेकडून मोबदला मागणाºया माजी नगरसेवकाला पोलिसांनी अटक केली होती. आता याप्रकरणाशी संबंधित अधिकाºयांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले यांनी दिली.