उंडणगावात पोलिसांचे पथसंचलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:04 AM2021-04-24T04:04:46+5:302021-04-24T04:04:46+5:30
सध्या वाढलेला कोरोनाचा प्रादुर्भाव, तसेच रमजान महिना सुरू असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क आहे. ...
सध्या वाढलेला कोरोनाचा प्रादुर्भाव, तसेच रमजान महिना सुरू असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क आहे. शुक्रवारी अजिंठा पोलीस ठाण्याच्या वतीने उंडणगाव येथे बसस्थानकापासून ते गावातील बाजारपेठ, महादेव चौक, ग्रामपंचायत, खुल्लोड वेशीपर्यंत पथसंचलन करून जनजागृती करण्यात आली. यात सपोनि. गिरिधर ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार बाबा चव्हाण, गुप्त शाखेचे लोखंडे, अव्हाड, जाधव, बामंदे, पोलीस कर्मचारी, टास्कफोर्स, दंगाकाबू पथक यांनी सहभाग घेतला होता. ग्रामस्थांनी पोलिसांवर पुष्पवृष्टी केली. यावेळी माजी सरपंच कृष्णा उखर्डे, दिलीप पाटील, उपसरपंच दत्तात्रय बोराडे, पंकज जयस्वाल, नागेश लांडगे, रामदास अंभोरे, विनायक धोत्रे आदींची उपस्थिती होती.
फोटो कॅप्शन : उंडणगाव येथे पथसंचलन करताना अजिंठा पोलीस.
230421\raghunath sawale_img-20210423-wa0035_1.jpg
उंडणगाव येथे पथसंचालक करताना अजिंठा पोलीस.