जिन्सीतील मटका अड्ड्यावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 10:54 PM2018-10-29T22:54:58+5:302018-10-29T22:55:29+5:30
औरंगाबाद : जिन्सी पोलीस ठाण्यासमोरच असलेल्या रणछोडदास गिरणीच्या मैदानावर भरदिवसा सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर गुन्हेशाखेने सोमवारी सायंकाळी छापा टाकला. या कारवाईत ८ जुगाऱ्यांना पकडण्यात आले असून, त्यांच्याकडून मटक्याच्या चिठ्ठ्यांसह रोख रक्कम असा सुमारे १६ हजार १० रुपयांचा ऐवज जप्त केला.

मोबीन खान हुसेन खान पठाण (रा. ५५,रा. जैनोद्दीन कॉलनी) असे मटका अड्डा चालविणाºयाचे नाव आहे. यावेळी जुगार खेळण्यासाठी आलेल्यांमध्ये शेख इरफान शेख गुलाब, सतीश दादाराव बहादुरे, शे. शब्बीर शेख बशीर (४५, रा. जवाहर कॉलनी, सिल्लोड), नितीन अमृतलाल जैन (४४, रा. धुळे), शेख राजीक शेख साजीद (२३, रा. सिल्लोड), सय्यद इम्रान सय्यद बाबर (सिल्लोड) आणि रामेश्वर धोंडीराम वाघमारे (२८, रा. जटवाडा रोड) यांचा समावेश आहे.
पोलीस निरीक्षक मधुकर सावंत म्हणाले की, जिन्सी परिसरातील रणछोडदास गिरणीच्या मैदानावर मटका जुगार सुरू असल्याची माहिती खबºयाने गुन्हेशाखेला दिली. त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राहुल सूर्यतळ, उपनिरीक्षक अफरोज शेख, कर्मचारी ज्ञानेश्वर ठाकूर, प्रमोद चव्हाण, रितेश जाधव हे विविध मोटारसायकलने तेथे गेले आणि त्यांनी चोहोबाजूने आरोपींना घेरून त्यांच्यावर धाड टाकली.
त्यावेळी मोबीन खान हा तेथे आलेल्या अन्य लोकांकडून पैसे घेऊन मटक्याच्या आकड्यांची बुकिंग करीत असल्याचे दिसले. त्यावेळी पोलिसांनी पंचांसमक्ष त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांची झडती घेतली. आरोपींविरोधात जिन्सी ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.