दोन दारू अड्डयावर पोलिसांची धाड

By Admin | Published: May 20, 2014 12:00 AM2014-05-20T00:00:41+5:302014-05-20T00:06:49+5:30

परभणी : उपविभागीय पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या विशेष पथकाने गंगाखेड व पालम येथे धाड टाकून देशी दारूसह साहित्य असे एकूण ४३ हजार २७५ रुपये जप्त करण्यात आले़

Police raid on two liquor bars | दोन दारू अड्डयावर पोलिसांची धाड

दोन दारू अड्डयावर पोलिसांची धाड

googlenewsNext

परभणी : उपविभागीय पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या विशेष पथकाने गंगाखेड व पालम येथे धाड टाकून देशी दारूसह साहित्य असे एकूण ४३ हजार २७५ रुपये जप्त करण्यात आले़ ही कारवाई १८ मे रोजी केली़ गंगाखेड येथे चौंडेश्वरी हॉटेल्ससमोर किरण प्रभाकर शिसोदीया (वय २४, रा़ माखणी) हा विना परवाना दुचाकी क्रमांक (एमएच २२ के- ७३७) घेऊन जात होता़ गाडीची किंमत अंदाजे ४० हजार रुपये व १ हजार २७५ रुपयांची दारू जप्त करण्यात आली़ या कारवाईमुळे गंगाखेड येथील बेकायदेशीर दारू विकणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत़ या प्रकरणी पोलिस नाईक रंगनाथ माने यांच्या फिर्यादीवरून गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे़ या प्रकरणाचा तपास पोलिस नाईक हिंगे हे करीत आहेत़ दुसर्‍या घटनेत पालम येथील शनिवार बाजार येथे बंडू शिवाजी घोरपडे, बालाजी प्रभू घोरपडे याच्याकडे बेकायदशीरित्या देशी दारूच्या ४० बाटल्या आढळून आल्या़ याची किंमत २ हजार एवढी आहे़ बेकायदेशीररित्या दारू विकण्यासाठी घेऊन जात होते़ या प्रकरणी पालम पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक गाडेवाड यांच्या फिर्यादीवरून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या प्रकरणाचा तपास पोहेकॉ मुंढे करीत आहेत़ जिल्ह्यात अवैध धंदे तेजीत पोलिस प्रशासन थातूर मातूर कारवाई करण्यातच धन्यता मानत आहे़ जिल्ह्यात राजरोसपणे झन्ना-मन्ना, कल्याण नावाचा मटका व बेकायदेशीररित्या देशी-विदेशी दारूची विक्री शहर व ग्रामीण भागात सर्रासपणे पोलिसांच्या आशिर्वादामुळे सुरू आहे़ कागदोपत्री कारवाई करण्यातच पोलिस धन्यता मानत आहेत़ जिल्ह्यातील बेकायदेशीर धंदे बंद होणे गरजेचे आहे़ मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे़

Web Title: Police raid on two liquor bars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.