पोलीसपत्नीची दागिन्याची पर्स पळविली
By | Published: December 2, 2020 04:05 AM2020-12-02T04:05:53+5:302020-12-02T04:05:53+5:30
तक्रारदार संध्या राजू संपाळ (वय ३५, रा. श्रीकृष्णनगर) यांचे पती औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलात कार्यरत आहेत. ...
तक्रारदार संध्या राजू संपाळ (वय ३५, रा. श्रीकृष्णनगर) यांचे पती औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलात कार्यरत आहेत. कन्नड तालुक्यातील हातनूर येथून आईवडिलांना दवाखान्यात दाखविण्यासाठी त्या सोमवारी दुपारी भावासोबत कारने शहरात आल्या. समर्थनगर रस्त्यावर कार उभी करून त्या आणि त्यांचे भाऊ आईवडिलांना रुग्णालयात घेऊन गेले. यावेळी त्यांची दोन लहान मुले कारमध्ये बसलेली होती. कारच्या सीटवर त्यांनी त्यांची पर्स आणि मोबाईल ठेवला होता. काही वेळाने पांढऱ्या रंगाच्या मोपेडवरून आलेल्या अनोळखी आरोपीने तुम्हाला आईने बोलावले, असे लहान मुलांना सांगितले. यावेळी मुलांची नजर चुकवून त्याने कारमधून पर्स चोरून नेली. या पर्समध्ये १८ ग्रॅम सोन्याची चेन , मोबाईल आणि रोख १० हजार रुपये असा सुमारे एक लाखांचा ऐवज होता. सुमारे तासाभराने त्या दवाखान्यातून कारकडे आल्या तेव्हा पर्स आणि मोबाईल चोरी झाल्याचे त्यांना दिसले. या घटनेनंतर त्यांनी क्रांतीचौक ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस निरीक्षक जी. डी. दराडे आणि कर्मचाऱ्यानी घटनास्थळी भेट देवून नाकाबंदी केली. मात्र, आरोपी पोलिसांच्या हाती लागले नाहीत.