तपासासाठी पोलीस पथके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:56 AM2017-08-22T00:56:53+5:302017-08-22T00:56:53+5:30

गेल्या काही महिन्यांत झालेले खून आणि घरफोड्यांच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीस यंत्रणा कमी पडल्याचे वृत्त सोमवारी ‘लोकमत’ने प्रकाशित केले. या वृत्ताची गंभीर दखल वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी घेतली

Police Squads for Check | तपासासाठी पोलीस पथके

तपासासाठी पोलीस पथके

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : गेल्या काही महिन्यांत झालेले खून आणि घरफोड्यांच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीस यंत्रणा कमी पडल्याचे वृत्त सोमवारी ‘लोकमत’ने प्रकाशित केले. या वृत्ताची गंभीर दखल वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी घेतली आणि संबंधित ठाणे प्रमुखांना ‘त्या’ गुन्ह्याच्या तपासाचा प्रगती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. एवढेच नव्हे, तर गुन्हे शाखेने गंभीर गुन्ह्यांच्या उलगडा करण्यासाठी पथके स्थापन केली.
शहरात गेल्या काही दिवसांपासून शहरात खून, लुटमार आणि घरफोडीच्या गुन्ह्यांत वाढ झाली आहे. गुन्हा घडल्यानंतर पोलीस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहोचतात आणि गुन्हा घडला ती परिस्थिती व तसा गुन्हा करणाºया सराईत गुन्हेगारांचा अंदाज बांधून संशयितांची धरपकड करतात; मात्र गेल्या काही दिवसांपासून शहरातील चोºया, घरफोडीच्या गुन्ह्याची उकल करण्यात पोलीस यंत्रणा कमी पडत आहे. गुन्ह्याची उकल करण्याच्या कामात पोलिसांना खबºयांचे नेटवर्क महत्त्वाची भूमिका निभावते. तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्यांच्या खबºयाचे स्वतंत्र नेटवर्क तयार केले होते. सुमारे ३५ खबरे त्यांच्या संपर्कात होते. विद्यमान पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनीही खबºयांना बक्षीस देण्याची योजना आणली. अनेक गुन्ह्यांचा तपास न लागल्याने पोलिसांच्या कामगिरीविषयी नागरिक प्रश्नचिन्ह उपस्थित करीत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने सोमवारी प्रकाशित केले. या वृत्ताची गंभीर दखल वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी घेतली. ‘टॉॅप टेन’ घटनांच्या तपासात काय प्रगती झाली, अशी विचारणा वरिष्ठांकडून करण्यात आली. शिवाय गुन्हे शाखेने प्रमुख गुन्ह्यांच्या तपासासाठी स्वतंत्र पथके स्थापन केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी सांगितले.

Web Title: Police Squads for Check

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.