पोलिसांना लागला वानरांचा लळा
By Admin | Published: July 1, 2014 11:18 PM2014-07-01T23:18:30+5:302014-07-02T00:26:01+5:30
टेंभूर्णी : जाफराबाद तालुक्यातील टेंभूर्णी येथील पोलिसांना वानरांचा चांगलाच लळा लागला असून पाणीटंचाईच्या काळात वानरांची पाण्याची तसेच खाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
टेंभूर्णी : जाफराबाद तालुक्यातील टेंभूर्णी येथील पोलिसांना वानरांचा चांगलाच लळा लागला असून पाणीटंचाईच्या काळात वानरांची पाण्याची तसेच खाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
जीव लावला की जंगलातील प्राणीसुध्दा जवळ येतात, या म्हणीचा प्रत्यय टेंभूर्णी (ता.जाफ्राबाद) येथील पोलिस ठाण्यात २९ जून रोजी आला. जमादार देविदास जावळे नेहमीप्रमाणे पोलिस ठाण्यात आले. त्यावेळी त्यांना वानरे पाण्यासाठी ठाण्यात असलेल्या रांजणाचे झाकन उघडण्याचा तर काही वानरे नळाची तोटी फिरविण्याचा प्रयत्न करीत होते. माकडांना तहान लागल्याचे पाहून जावळे यांनी एक बाटली भरुन पाणी आणून ठेवले. वानरांनी पाणी घेतल्यानंतर लगेच जावळे यांनी वानरांसाठी दुकानातून शेंगदाणे आणले. त्यांनी शेंगदाणे आणल्याबरोबर वानरे माणसाप्रमाणे त्यांच्याजवळ येऊन बसली.
नंबर लावल्याप्रमाणे रांगेत बसले. जावळे यांच्या हातातील शेंगदाणे घेऊन खाऊ लागली. वानरे पाण्याची व्यवस्था व खाण्याची व्यवस्था होत असल्याने वानरे आपली शाळा ठाण्याच्या आवारातच भरवितात.
ज्यांना जमेल ते पोलिस कर्मचारी यांना पाणी ठेवतात. मुक्या प्राण्यांविषयीचे प्रेम यावरुन दिसून येते. आपली भूमिका बजावून पोलिस वानरांना माणुसकी दाखवत आहे, हे मात्र खरे. या उपक्रमाचे गाव परिसरातून कौतुक होत आहे. (वार्ताहर)