मास्क लावण्यावरून मनपा पथकाला राजकीय कार्यकर्त्यांची मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2021 01:31 PM2021-03-02T13:31:21+5:302021-03-02T13:37:56+5:30

कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे कंत्राटी कर्मचारी (माजी सैनिक) विनामास्क, सॅनिटायझर, थर्मल गन अथवा ऑक्सिमीटर नसल्याचे कारण पुढे करत दुकानदारांवर रोज दंडात्मक कारवाई करतात.

Political activists beaten up Municipal team for wearing masks | मास्क लावण्यावरून मनपा पथकाला राजकीय कार्यकर्त्यांची मारहाण

मास्क लावण्यावरून मनपा पथकाला राजकीय कार्यकर्त्यांची मारहाण

googlenewsNext
ठळक मुद्देमनपा प्रशासकांच्या वाहनातून सोमवारी सायंकाळी ६ वाजता एक पथक गुलमंडी आले. संतापलेले व्यापारी आणि कार्यकर्त्यांनी पथकाला चांगलीच मारहाण केली.

औरंगाबाद : विनामास्क विद्यार्थ्यावर दंडात्मक कारवाई करणाऱ्या महापालिकेच्या पथकाला समजावून सांगणाऱ्या कार्यकर्त्यास अरेरावीची भाषा करणाऱ्या पथकाला कार्यकर्ते आणि व्यापाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना सोमवारी सायंकाळी गुलमंडी परिसरात घडली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत क्रांती चौक ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता. मनपाचे कंत्राटी कर्मचारी मनमानी पध्दतीने व्यापारी आणि हॉकर्सकडून दंडाच्या नावाखाली ५०० ते ५ हजार रुपये उकळत असल्याची तक्रार व्यापारी आणि कार्यकर्त्यांनी पोलिसांत नोंदविली.

कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे कंत्राटी कर्मचारी (माजी सैनिक) विनामास्क, सॅनिटायझर, थर्मल गन अथवा ऑक्सिमीटर नसल्याचे कारण पुढे करत दुकानदारांवर रोज दंडात्मक कारवाई करतात. ५०० ते ५००० रुपयांपर्यंत ते दंड ठोठावतात. रोज होणाऱ्या कारवाईमुळे व्यापारी त्रस्त झाले आहेत. मनपा प्रशासकांच्या वाहनातून सोमवारी सायंकाळी ६ वाजता एक पथक गुलमंडी आले. तेथे त्यांनी विनामास्क लोकांवर कारवाई सुरू केली. एका विद्यार्थ्यांवरही कारवाई करू लागले. त्याच्याकडून दंडाची वसुली केली जात होती. विद्यार्थी गयावया करत असताना तेथे उभे माजी नगरसेवक, भाजपाचे कार्यकर्ते सुरेंद्र कुलकर्णी यांनी पथकाला समजावून सागण्याचा प्रयत्न केला. मात्र, पथक त्यांचे काहीएक ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते.

तेवढ्यात माजी आमदार किशनचंद तनवाणी देखील तेथे आले. त्यांनी देखील पथकाला, हवे तर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलतो, पण त्या विद्यार्थ्याला सोडा, अशी विनंती केली. पथकाने तनवाणी यांनाही अरेरावीची भाषा केली. त्यामुळे संतापलेले व्यापारी आणि कार्यकर्त्यांनी पथकाला चांगलीच मारहाण केली. पथकाने सिटी चौक पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र ही घटना क्रांती चौक ठाण्याच्या हद्दीत घडल्याचे समजल्याने त्यांना तक्रार देण्यासाठी क्रांती चौक पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले. क्रांती चौक ठाण्यात रात्री उशिरापर्यंत पथकातील कर्मचारी तक्रार देण्यासाठी बसून होते. मात्र, वृत्त देईपर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता.

मनपा पथकाविरुध्द सिटी चौक ठाण्यात तक्रार अर्ज
मनपाच्या पथकाकडून कॅरीबॅग असो अथवा कोविडच्या नावाखाली व्यापाऱ्यांकडून अवाच्या सवा दंड वसुली केली जाते. त्याच्या बऱ्याचदा पावत्या दिल्या जात नाहीत. मनपाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, असा तक्रार अर्ज व्यापाऱ्यांनी सिटी चौक ठाण्यात दाखल केला.

गुंडांसारखी हप्ता वसुली
मी गुलमंडीवर वैयक्तिक कामानिमित्त गेलो होतो. तेथे महापालिकेचे नागरिक मित्र पथक दोन विद्यार्थ्यांना मास्क न लावल्याबद्दल दंड आकारत होते. दोन्ही विद्यार्थी अक्षरशः रडत होते. विद्यार्थ्यांच्या विनंतीवरून व नागरिकांच्या म्हणण्यानुसार मी पथकाला समजावून सांगण्यासाठी गेलो. विद्यार्थ्यांसोबत त्यांची भाषा गुंडासारखी होती. माझ्या सोबतही अत्यंत उद्धट आणि असभ्य भाषेत पथकातील कर्मचारी बोलत होते. महापालिकेने तुम्हाला चांगल्या कामासाठी नेमले आहे, असे मी समजावून सांगत होतो. सभ्यतेची भाषा त्यांना कळतच नव्हती. त्यामुळे त्यांना कळेल या भाषेतच मला बोलावे लागले. घटनेनंतर माजी आ. किशनचंद तनवाणीसुद्धा तेथे आले. त्यांच्या समोरही पथकातील कर्मचारी तसेच वागत होते. या कर्मचाऱ्यांच्या विरोधात उद्या पोलिसांत तक्रार देणार आहे. महापालिका प्रशासकांची भेट घेऊन व्यथा मांडू.
-सुरेंद्र कुलकर्णी, माजी नगरसेवक

Web Title: Political activists beaten up Municipal team for wearing masks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.